Water Metro: मुंबईत तयार होणार जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क, कुठून कसा प्रवास अन् काय आहे विशेष?

Mumbai Water Metro: मुंबईकरांच्या सेवेत लवकरच वॉटर मेट्रो येणार आहे. हे जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क असणार आहे. त्याची वैशिष्ट्ये जाणून घ्या...
Water Metro: मुंबईत तयार होणार जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क, कुठून कसा प्रवास अन् काय आहे विशेष?
Mumbai Water MetroSaam Tv
Published On
  • मुंबई वॉटर मेट्रो प्रोजेक्ट तयार केला जात आहे

  • हे जगातील सर्वात मोठे वॉटर मेट्रो नेटवर्क

  • २०३१ पर्यंत मुंबई वॉटर मेट्रो सुरू होणार

  • यामुळे मुंबईकरांचा प्रवास आरामदायी होणार आहे

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईचा कायापालट लवकरच होणार आहे. कारण मुंबईकरांच्या सेवेत लवकरच वॉटर मेट्रो येणार आहे. मुंबईत जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क तयार केले जात आहे. यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना होणारं ट्रॅफीक आणि रेल्वे प्रवास करताना होणारा विलंब यातून मुंबईकरांची सुटका होईल आणि त्यांचा प्रवास आरामदायी आणि सुसाट होईल. मुंबई आणि आसपासच्या शहरांमधील वाढत्या वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्र सरकार मुंबईकरांसाठी एक विशेष प्लान घेऊन आला आहे. सरकार अंदाजे ६,०६६ कोटी खर्च करून जगातील सर्वात मोठे वॉटर मेट्रो नेटवर्क विकसित करत आहे. रस्ते आणि रेल्वेवरील ताण कमी करणे, प्रवासाचा वेग वाढवणे आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देणे हे या मागचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे. या योजनेअंतर्गत शेकडो किलोमीटर लांबीचे जलमार्गाचे जाळे उभारले जाणार आहे. इलेक्ट्रट्रिक-हायब्रीड बोटीही आणल्या जातील आणि सिंधुदुर्गात एक आधुनिक बोट-बांधणी केंद्र तयार केले जाणार आहे. या प्रोजेक्टमुळे येत्या काही वर्षांत लाखो प्रवाशांना थेट फायदा होईल.

Water Metro: मुंबईत तयार होणार जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क, कुठून कसा प्रवास अन् काय आहे विशेष?
पब्लिक ट्रान्सपोर्टमधला जबरदस्त चमत्कार! एकाच स्टेशनवर थांबणार मोनो, मेट्रो आणि मुंबई लोकल

काय खास असेल?

हा प्रोजेक्ट ६,०६६ कोटी रुपये खर्च करून विकसित केला जाणार आहे. ३४० किलोमीटर लांबीचे वॉटर-मेट्रो नेटवर्क तयार केले जाणार आहे.

एकूण ३३ जलमार्ग आणि ४४ आधुनिक टर्मिनल बांधण्यात येणार आहेत. प्रवाशांसाठी २०३ इलेक्ट्रिक हायब्रीड बोटी या मार्गावर चालवण्यात येईल. हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर हे जगातील सर्वात मोठे वॉटर-मेट्रो नेटवर्क म्हणून ओळखले जाईल.

Water Metro: मुंबईत तयार होणार जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क, कुठून कसा प्रवास अन् काय आहे विशेष?
Mumbai Metro Line-4: मेट्रोच्या कामामुळे LBS रोड 30 सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद; कोणते असतील पर्यायी मार्ग?

कधीपर्यंत सेवेत येणार वॉटर मेट्रो?

२०३१ पर्यंत अंदाजे ७५ दशलक्ष प्रवाशांना या वॉटर मेट्रोचा लाभ घेता येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रोजेक्टबद्दल सांगितले की, फक्त रस्ते आणि रेल्वे जाळ्यांचा विस्तार करून मुंबईतील वाहतुकीची समस्या सोडवता येणार नाही. त्यामुळे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये वाहतुकीला एक महत्त्वाचा भाग बनवले जात आहे. याशिवाय वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पॉड टॅक्सी सेवा लवकरच महाराष्ट्र सरकार सुरू करणार आहे. याचा देखील मुंबईकरांना चांगला फायदा होईल.

Water Metro: मुंबईत तयार होणार जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क, कुठून कसा प्रवास अन् काय आहे विशेष?
Mumbai Ahmedabad bullet train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत सर्वात मोठी अपडेट; मुंबईपर्यंत कधी पोहोचणार? रेल्वेमंत्र्यांनी सांगितले महत्वाचे टप्पे

वॉटर मेट्रोची निर्मिती केंद्र कुठे असेल?

मुंबई वॉटर मेट्रो प्रोजेक्टसाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि झोया मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात एक करार झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात जवळपास २२ एकर जागेवर अंदाजे १५० कोटी रुपये खर्च करून एक इलेक्ट्रट्रिक बोट उत्पादन केंद्र उभारले जात आहे. याठिकाणी वॉटर मेट्रोसाठी इलेक्ट्रक्ट्रिक आणि पर्यावरणपूरक बोटींचे उत्पादन केले जाणार आहे.

Water Metro: मुंबईत तयार होणार जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क, कुठून कसा प्रवास अन् काय आहे विशेष?
Mumbai Metro 4: वडाळा-कासारवडवली मेट्रोच्या कारशेडचा मार्ग मोकळा; अंतर, स्टेशन संख्या, Route काय? जाणून घ्या संपूर्ण प्रकल्पाची माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com