
अजय दुधाणे, साम प्रतिनिधी
Mumbai Thane weather update in marathi : मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात सोमवारची पहाट सर्वाधिक थंड ठरली होती. हा गारठा पुढील २ ते ३ दिवस कायम राहणार असल्याची माहिती बदलापूरमधील हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी दिली आहे. पुढील महिन्यात तापमान सरासरी राहण्याची शक्यता आहे. १५ जानेवारीच्या दरम्यान सर्वाधिक गारठा राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात तापमानाचा पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे. पुणे, नाशिक, मराठवाडा येथे तापमान घसरण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाण्यात गारठा वाढला असून सोमवारी पहाटे बदलापूर शहरात १०.४ अंश इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. बदलापूर शहरातील हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी त्यांच्या खासगी स्वयंचलित हवामान केंद्रात ही नोंद केली आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे बदलापूर शहरात आधी पोहोचत असून ते इकडून मुंबईच्या दिशेने वाहत जातात.
त्यामुळे बदलापूर शहरात कमी तापमानाची नोंद होते आणि त्यापुढे अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली आणि ठाण्यामार्गे मुंबईत हे तापमान वाढत जातं, अशी माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली. त्यामुळेच मुंबईत सोमवारी पहाटे १४ अंश तापमानाची नोंद झाली. आता हा गारवा पुढील काही दिवस कायम राहील आणि जानेवारी महिन्यात आणखी २ ते ३ अंशांनी तापमान घसरून मुंबई-ठाण्यात एक आकडी तापमानाची नोंद होईल, असा अंदाज मोडक यांनी व्यक्त केलाय.
अभिजीत मोडक यांनी बदलापूर शहरात त्यांच्या इमारतीच्या गच्चीवर खासगी स्वयंचलित हवामान केंद्र बसवलं आहे. या माध्यमातून तापमान, वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग, आर्द्रता, पर्जन्यमान या सगळ्याची नोंद त्यांच्याकडे होत असते. मुंबई आणि उपनगरातील तापमान मोजण्यासाठी कुलाबा आणि सांताक्रुझ या भारतीय हवामान विभागाच्या वेधशाळांची आकडेवारी ग्राह्य धरली जाते. मात्र या वेधशाळा त्या त्या भागातील तापमानाची नोंद घेत असून बदलापूर शहर हे मुंबईपासून ४० किलोमीटर दूर असल्यानं इथल्या तापमानाची नोंद मात्र अधिकृतरित्या होतच नाही. त्यामुळेच मोडक यांनी स्वयंचलित खासगी हवामान केंद्र बदलापुरात उभारलं असून त्याचा या भागातल्या आकडेवारीसाठी फायदा होतोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.