मुंबईत तस्कराचा पोलिसांवर हल्ला, नंतर खाडीत मारली उडी; तासाभरानंतर असा अडकला जाळ्यात, १.१५ किलो 'समुद्रातील सोने' जप्त

mumbai news : मुंबईच्या मालाडमध्ये तस्कराने पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडली. परंतु तासाभरानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.
Mumbai malad news
mumbai crime newsSaam tv
Published On
Summary

मालवणी पोलिसांची मोठी कारवाई

१.१५ किलो स्पर्म व्हेल अॅम्बरग्रीससह तरुण अटकेत

पोलिसांकडून आरोपी तस्कराची कसून चौकशी सुरू

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईतील मालवणी पोलिसांनी वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई केली. त्यांनी २४ वर्षीय तरुणाला १.१५ किलो स्पर्म व्हेल अॅम्बरग्रीससह अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अदनान खान असे आहे. आरोपीकडे जप्त करण्यात आलेला अॅम्बरग्रीस हा आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर वन्यजीव व्यापारात अत्यंत मौल्यवान मानला जातो.

Mumbai malad news
Pune news: बायको मिळावी म्हणून तरुणाचा भन्नाट जुगाड; पोलीस असल्याचे खोटे फ्लेक्स लावले...आता खरे पोलीस मागावर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमित गस्तीदरम्यान संशयास्पद हालचाली आढळल्याने अदनान खान याला अडवून चौकशी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी आरोपीने पोलिसांशी वाद घालत एका पोलिस शिपायावर हल्ला केला. त्यानंतर तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता आरोपीने सुटकेसाठी जवळच्या खाडीत उडी मारल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पोलिसांनी शिताफीने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.

तपासादरम्यान आरोपीकडून १.१५ किलो स्पर्म व्हेल अॅम्बरग्रीस जप्त करण्यात आले. अॅम्बरग्रीस हा स्पर्म व्हेलच्या आतड्यांमध्ये तयार होणारा मेणासारखा पदार्थ असून सुगंधी द्रव्य उद्योगात त्याला मोठी मागणी असते. परफ्यूमचा सुगंध अधिक काळ टिकवण्यासाठी तसेच काही विशेष उत्पादनांमध्ये त्याचा वापर केला जातो. त्यामुळे या पदार्थाला “समुद्रातील सोने” किंवा “फ्लोटिंग गोल्ड” असेही म्हटले जाते.

Mumbai malad news
Mumbai : 'मला हिंदू मुली आवडतात...' अश्लील व्हिडिओ पाठवले, शारीरिक संबंधांची मागणी; नाशिकनंतर मुंबईत कॉर्पोरेट जिहाद

भारतामध्ये स्पर्म व्हेल ही वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत संरक्षित प्रजाती असून तिच्याशी संबंधित अॅम्बरग्रीसची खरेदी-विक्री, साठवण आणि व्यापार बेकायदेशीर आहे. त्यामुळे या प्रकरणाला वन्यजीव गुन्ह्याच्या दृष्टीने गंभीर मानले जात आहे. मालवणी पोलिसांनी आरोपीविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अॅम्बरग्रीसचा पुरवठा कुठून झाला, तो कोणाला विकला जाणार होता आणि या मागे मोठे तस्करी रॅकेट आहे का, याचा तपास सुरू आहे. मुंबईत वन्यजीव तस्करीविरोधातील ही महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com