मेट्रो अधिकाऱ्याच्या कृत्याने मुंबई हादरली; इंजिनीअर असलेल्या महिलेवर ऑफिसमध्येच अत्याचार

mumbai crime news : मुंबईत मेट्रो अधिकाऱ्याच्या कृत्याने खळबळ उडाली आहे. इंजिनीअर असलेल्या महिलेवर ऑफिसमध्येच अत्याचार केल्याचे समोर आलं आहे.
mumbai shocking
mumbai newsSaam tv
Published On
Summary

मुंबईत महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मेट्रोच्या ऑफिसमध्ये महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग

चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

संजय गदडे, साम टीव्ही

मुंबईत कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महामुंबई मेट्रोच्या चारकोप डेपोमध्ये एका सुरक्षा व्यवस्थापकाने कनिष्ठ महिला अभियंत्यावर लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. मेट्रोमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत कार्यालयातच विनयभंग केल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. या प्रकरणी चारकोप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, विरार येथे राहणारी ४६ वर्षीय महिला अभियंता महामुंबई मेट्रो संचालन मर्यादित कंपनीत कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहे. कायमस्वरूपी नोकरीसाठी प्रयत्न सुरू असताना, डेपोतील सुरक्षा व्यवस्थापकाने त्याचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. मार्च २०२५ मध्ये मस्टर मंजुरीच्या कामानिमित्त ती अधिकाऱ्याला भेटण्यासाठी गेली. त्यावेळी “तुमचे सरकारी काम मीच करून देऊ शकतो,” असे सांगून त्याने तिच्याशी अश्लील वर्तन केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

mumbai shocking
Mumbai : 'मला हिंदू मुली आवडतात...' अश्लील व्हिडिओ पाठवले, शारीरिक संबंधांची मागणी; नाशिकनंतर मुंबईत कॉर्पोरेट जिहाद

महिलेने प्रसंगावधान राखत त्या ठिकाणाहून स्वतःची सुटका केली. त्यानंतर याबाबत महिला आयोग तसेच कंपनीच्या अंतर्गत समितीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर तिला नोकरीवरून कमी करण्यात आल्याचा आरोपही तिने केला आहे. मात्र महिला आयोगाच्या हस्तक्षेपानंतर तिला पुन्हा कामावर घेण्यात आले.

mumbai shocking
Shocking : “तू मला खूश कर, मी तुला जास्त दिवस सुट्टी देईन,” नामांकित कंपनीच्या बॉसची महिला कर्मचाऱ्याकडे अश्लील मागणी

दरम्यान, सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर चारकोप पोलिसांनी संबंधित सुरक्षा व्यवस्थापकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे. आरोपी अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महिलेने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. सरकारी अधिकारी असल्याने त्याला संरक्षण दिले जात असल्याचा आरोपही तिने केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com