Abhijeet Dipke : अभिजित दीपकेंवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी; शिवाजी पार्क परिसरातील आंदोलन भोवणारं

CJP Abhijeet Dipke Mumbai Police FIR : शिवाजी पार्कमधील CJP आंदोलनादरम्यान गोपालकृष्ण पिल्लई यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू. CJP संस्थापक अभिजीत दिपके यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी.
Abhijeet Dipke News
Abhijeet Dipke News AI Image
Published On: 

निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशातील नागरिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी CJP ने २ ऑक्टोबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात आंदोलनाची हाक दिली. या आंदोलनाला अनेकजण उपस्थित होते. या आंदोलनाला मुंबई पोलिसांची परवानगी नाकारलेली असतानाही करण्यात आला. दरम्यान या मोर्चामध्ये एका व्यक्तीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. या मृत्यूप्रकरणी शिवाजी पार्क सिटिझन्स फोरमने CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पोलिसांकडे तक्रारही करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचं नाव गोपालकृष्ण सुब्बय्या पिल्लई असं असून ते मूळचे केरळचे रहिवासी होते. ते ठाण्यातील दोस्ती वेस्ट काउंटी येथील बी विंगमध्ये राहत होते. आंदोलन पाहण्यासाठी पिल्लई हे शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास शिवाजी पार्कमध्ये पोहोचले होते. दरम्यान, आंदोलनाच्या ठिकाणी असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांचा मित्र आणि घटनास्थळी तैनात असलेल्या पोलिसांनी तातडीने त्यांना शिवाजी पार्क येथील सुश्रुषा रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी घटनास्थळीच CPR देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचारादरम्यान पिल्लई यांचा मृत्यू झाला.

Abhijeet Dipke News
Bus Accident News : घाटात भीषण अपघात! ५४ प्रवाशांना अंत्यविधीसाठी घेऊन जाणारी बस पलटली; ४ महिलांचा मृत्यू

या घटनेनंतर आंदोलनाच्या आयोजकांविरोधातही पोलिसांनी कारवाई केली आहे. शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात आंदोलनाचे आयोजक तसेच 400 ते 500 अज्ञात समर्थक आणि आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम 189 आणि 223, तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम 37(1)(3) आणि 135 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Abhijeet Dipke News
Accident News : नागपूरमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रेलरने चौघांना चिरडलं, पती- पत्नीसह चिमुकल्याचा जागीच मृत्यू

दरम्यान, हे आंदोलन निवडणूक आयोग आणि SIR प्रक्रियेच्या विरोधात आयोजित करण्यात आलं होतं. मात्र, आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली असतानाही मोठ्या संख्येने गर्दी जमवल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वी रहिवासी आणि वकील सिद्धी देओळेकर यांनी अभिजीत दिपके, आशुतोष रांका, सौरव दास, रत्ना सिंह आणि इतरांविरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती. परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com