मुंबईला उद्याही पावसाचा अलर्ट, बुधवारी शाळा-ऑफिस चालू की बंद? व्हायरल मेसेजबाबत BMCकडून मोठा खुलासा

Mumbai School Closed: उद्याही मुंबईत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालये, कार्यालये चालू असणार की बंद असणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
मुंबईला उद्याही पावसाचा अलर्ट, बुधवारी शाळा-ऑफिस चालू की बंद? व्हायरल मेसेजबाबत BMCकडून मोठा खुलासा
Published On
Summary
  • मुंबईतील शाळा, महाविद्यालये आणि वर्क फ्रॉम होमबाबतचा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल

  • मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.

  • पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज

दोन दिवसापासून मुंबई आणि मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस होत आहे. धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक भागातील रस्त्यांना नदीचे स्वरुप आल्याचं दिसत आहे. अतिवृष्टीमुळे आज राज्यातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांना आज मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. दरम्यान पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यातील इतर भागात पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबईला उद्याही पावसाचा अलर्ट, बुधवारी शाळा-ऑफिस चालू की बंद? व्हायरल मेसेजबाबत BMCकडून मोठा खुलासा
Monsoon Rain: 80 किमी वेगाचं वादळ अन् ढगांचा गडगडाट; महाराष्ट्रासह २१ राज्यात पुढील ५ दिवस 'जोर'धार पाऊस, IMDचा अलर्ट

त्यामुळे मु्ंबईतील शाळांना सुट्टी देण्यात येईल का असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्याचवेळी सोशल मीडियावर मुंबईतील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याचा मेसेज व्हायरल झाला आहे. काय खरंच उद्याही म्हणजेच बुधवार ८ जुलै रोजी शाळा, महाविद्यालय आणि खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत का?

मुंबईला उद्याही पावसाचा अलर्ट, बुधवारी शाळा-ऑफिस चालू की बंद? व्हायरल मेसेजबाबत BMCकडून मोठा खुलासा
School Closed: पालघरमधील अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयांना उद्याही सुट्टी; पावसाचा अलर्ट

दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजबाबत मुंबई महापालिकेनं खुलासा केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा मेसेज हा खोटा असल्याचं स्पष्टीकरण बीएमसीकडून देण्यात आले आहे. शाळा,महाविद्यालयांना बुधवार ८ जुलै रोजी सुट्टी देण्यात आली आहे, असा कोणताच आदेश महापालिकेडून देण्यात आला नसल्याचं पालिकेनं आपल्या एक पोस्टमध्ये म्हटलंय.

मुंबईतील शाळा मंगळवार, दिनांक ८ जुलै २०२६ रोजी बंद असतील. तसेच, खासगी क्षेत्रातील कार्यालयांना घरून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे, अशा आशयाचा संदेश समाजमाध्यमांतून प्रसारित होत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे याबाबत स्पष्ट करण्यात येत आहे की, हा संदेश पूर्णत: खोटा असून महानगरपालिकेने अशाप्रकारची कोणतीही सूचना दिलेली नाही.

अशाप्रकारच्या खोट्या, दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहावे. विश्वसनीय व अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (MyBMC) अधिकृत समाजमाध्यम खाते फॉलो करावे. तसेच, १९१६ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

जुलै ७ तारखेसाठी होता महापालिकेचा आदेश

भारतीय हवामान विभागाने ७ जुलै आज मंगळवारसाठी मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि नाशिकच्या घाटांसाठी रेड अलर्ट जारी केला होता. अतिवृष्टी, सोसाट्याचा वारा आणि पाणी साचण्याची शक्यता वर्तवली होती. मुसळधार पावसामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) शाळा मंगळवार, ७ जुलै रोजी बंद राहतील. त्याशिवाय खासगी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना महापालिकेकडून देण्यात आल्या होत्या.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवसांत देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. छत्तीसगड, कर्नाटक, कोकण, गुजरात आणि मुंबईसह मध्य महाराष्ट्रातील विविध भागांतही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com