Shocking : "३ हजार दे आणि...." स्पा सेंटरच्या नावाखाली भलतेच धंदे, पोलिसांनी धाड टाकताच धक्कादायक प्रकार उघड

Mumbai Powai Spaa Sex Racket Busted : मुंबईतील पवईच्या हिरानंदानी गार्डन परिसरातील स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा. कथित सेक्स रॅकेट प्रकरणी व्यवस्थापक भारतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 18 वर्षीय तरुणीची सुटका करण्यात आली आहे.
Mumbai Powai Crime News
Mumbai Powai Crime News AI image
Published On: 

मुंबईतील पवई परिसरातील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणात स्पाची व्यवस्थापक भारती हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका 18 वर्षीय तरुणीची सुटका केली आहे. संबंधित तरुणीला महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

पोलिसांना काही दिवसांपूर्वी पवईतील हिरानंदानी गार्डन परिसरात असलेल्या पवई प्लाझामधील एका स्पामध्ये बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी एक बोगस ग्राहक पाठवून गुप्त तपास सुरू केला. ठरलेल्या प्लॅननुसार बोगस ग्राहक स्पामध्ये गेला. तेथे त्याची भेट स्पाची व्यवस्थापक भारती हिच्याशी झाली. ग्राहकाने मसाजच्या सेवांबाबत विचारणा केली असता तिने मसाजसाठी दोन हजार रुपये आणि शारीरिक संबंधांसाठी तीन हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.

Mumbai Powai Crime News
Blood Sugar : गोड पदार्थ खाणं बंद करूनही रक्तातील साखर वाढतेय? रोजच्या 'या' ५ सवयी ठरतायत जीवघेण्या

यानंतर व्यवस्थापकाने एका तरुणीला ग्राहकासोबत स्पामधील खोलीत पाठवले. ठरल्याप्रमाणे बोगस ग्राहकाने पोलिसांना इशारा दिल्यानंतर पवई पोलिसांनी तात्काळ स्पावर छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी तरुणीची सुटका केली आणि स्पामध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर व्यवहाराबाबत पुरावे गोळा केले.

Mumbai Powai Crime News
Transfer News : महाराष्ट्र पोलीस दलात मोठी प्रशासकीय उलथापालथ! १६ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

या प्रकरणानंतर पोलिसांनी स्पाची व्यवस्थापक भारती हिच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा नोंदवला आहे. तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपासही सुरू करण्यात आला आहे. परिसरात अशा प्रकारचे बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. या कारवाईमुळे पवई परिसरातील बेकायदेशीर प्रकारांवर पोलिसांनी लक्ष ठेवले असल्याचे स्पष्ट झाले असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी तपास अधिक वेगाने सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.