Blood Sugar : गोड पदार्थ खाणं बंद करूनही रक्तातील साखर वाढतेय? रोजच्या 'या' ५ सवयी ठरतायत जीवघेण्या

Blood Sugar Control Tips : गोड पदार्थ टाळूनही रक्तातील साखर वाढतेय? जास्त भात-पोळी खाणं, अपुरी झोप, तणाव, कमी शारीरिक हालचाल आणि पाण्याची कमतरता यांसारख्या सवयींचा मधुमेहावर कसा परिणाम होतो, मधुमेह नियंत्रणासाठी महत्त्वाच्या टिप्स वाचा.
high blood sugar in diabetic patients
high blood sugar in diabetic patientsAI Image
Published On: 

मधुमेह असलेल्या व्यक्तींना रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. अनेक जण गोड पदार्थ खाणं बंद करतात, औषधं वेळेवर घेतात आणि खाण्यापिण्यात बदल करतात. तरीही काही वेळा रक्तातील साखरेची पातळी वाढलेली दिसते. यामागे केवळ गोड पदार्थ कारणीभूत नसतात, तर रोजच्या जीवनातील काही सवयीही याला कारणीभूत ठरू शकतात.

जास्त भात आणि पोळी खाणं

भात, पोळी, ब्रेड, बटाटा यांसारख्या पदार्थांमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं. हे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास रक्तातील साखर वाढू शकते. त्यामुळे आहारातून हे पदार्थ पूर्णपणे बंद करण्याऐवजी योग्य प्रमाणात खाणं महत्त्वाचं आहे.

दिवसभर एकाच जागी बसून राहणं

ऑफिसमध्ये किंवा घरी अनेक तास बसून काम केल्याने शारीरिक हालचाल कमी होते. याचा परिणाम शरीरातील साखरेचा वापर होण्यावर होतो. त्यामुळे कामाच्या मध्ये थोडं चालणं किंवा हलका व्यायाम करणं फायदेशीर ठरतं.

high blood sugar in diabetic patients
Railway Accident : रेल्वेचा भीषण अपघात! इंजिनशिवाय ६ किलोमीटर धावले ७ डब्बे; पाहा Video

पुरेशी झोप न घेणं

रोज पुरेशी झोप न मिळाल्यास शरीराच्या कामकाजावर परिणाम होतो. त्यामुळे इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होऊन रक्तातील साखर वाढू शकते.

सतत तणावात राहणं

कामाचा ताण, चिंता आणि मानसिक अस्वस्थता यांचाही रक्तातील साखरेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्वतःसाठी थोडा वेळ काढणं आणि मन शांत ठेवणं गरजेचं आहे.

शरीरात पाणी कमी होणं

पुरेसं पाणी न प्यायल्यास शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण अधिक दिसू शकतं. याशिवाय हार्मोन्समधील बदल, ताप, संसर्ग आणि काही औषधांमुळेही रक्तातील साखर वाढू शकते.

high blood sugar in diabetic patients
Death News : आई पहाटे ४:३० वाजता उठवायला गेली पण...' लोकप्रिय अभिनेत्याचा झोपेतच मृत्यू,सिनेसृष्टीवर शोककळा

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी काय कराल?

संतुलित आहार घ्या, नियमित व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या आणि दिवसभर सक्रिय राहा. रक्तातील साखर वारंवार वाढत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वतःहून औषधं बंद करू नका किंवा त्यांचा डोस बदलू नका. योग्य आहार आणि निरोगी जीवनशैलीच्या मदतीने मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.