Transfer News : महाराष्ट्र पोलीस दलात मोठी प्रशासकीय उलथापालथ! १६ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Maharashtra Police Transfer Update News : महाराष्ट्र पोलीस दलात मोठे प्रशासकीय फेरबदल! १६ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी. ठाण्यातील अमरसिंग जाधव, प्रशांत कदम आणि शिवराज पाटील यांना एक वर्षाची मुदतवाढ.
Maharashtra Police Transfer News
Maharashtra Police Transfer News AI Image
Published On: 
Summary
  • महाराष्ट्र पोलीस दलात १६ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत

  • गृह विभागाने २ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रशासकीय फेरबदलाचा शासन आदेश काढला

  • ठाणे शहरातील अमरसिंग जाधव आणि प्रशांत कदम यांना एक वर्षाची मुदतवाढ मिळाली

महाराष्ट्र पोलीस दलात मोठा प्रशासकीय बदल करण्यात आला आहे. १६ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस दलात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने जारी केले आहेत. या आदेशात ठाणे शहरातील तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या पदावर आणखी एक वर्ष काम करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस दलातील या निर्णयाची सध्या चर्चा सुरू आहे.

गृह विभागाने 2 नोव्हेंबर 2026 रोजी यासंदर्भातील शासन आदेश काढला. पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक एकच्या शिफारशीनुसार या बदल्या आणि मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशानुसार, ठाणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव आणि परिमंडळ क्रमांक 5 चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचबरोबर कोकण परिक्षेत्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील शिवराज पाटील यांनाही त्यांच्या पदावर एक वर्ष अधिक काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे या तिन्ही अधिकाऱ्यांकडे सध्याची जबाबदारी कायम राहणार आहे.

Maharashtra Police Transfer News
Blood Sugar : गोड पदार्थ खाणं बंद करूनही रक्तातील साखर वाढतेय? रोजच्या 'या' ५ सवयी ठरतायत जीवघेण्या

दुसरीकडे, ठाणे पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत. ठाणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांची बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी ठाणे शहर पोलीस दलातील परिमंडळ क्रमांक 1 च्या पोलीस उपायुक्त मीना मखवाना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय जयंत बजबळे यांची ठाणे शहर पोलीस दलात पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Maharashtra Police Transfer News
Gold Rate Today : दिवाळीपूर्वी सोने महागले! १ तोळा आज इतक्या रुपयांनी वाढले; वाचा 18k,22k,24k चे ताजे दर

राज्यातील पोलीस दलात सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे निर्णय घेतले जात आहेत. अशा परिस्थितीत ठाण्यातील तीन अधिकाऱ्यांना देण्यात आलेली एक वर्षाची मुदतवाढ विशेष महत्त्वाची मानली जात आहे. या निर्णयामुळे ठाणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये काही बदल होणार असले, तरी महत्त्वाच्या पदांवरील काही अधिकारी मात्र कायम राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.