Mumbai News: मुंबईत माजी खासदाराविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Khar Road Accident: मुंबईतल्या खारमध्ये माजी खासदाराच्या कारने दुचाकीला धडक दिली होती. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी माजी खासदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai News: मुंबईत माजी खासदाराविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ
Mumbai Car Accident Saam Tv
Published On: 
  • मुंबई खार अपघात प्रकरणात मोठी अपडेट

  • माजी खासदार सुधीर सावंत यांच्याविरोधात गुन्हा

  • सुधीर सावंत यांच्या कारच्या अपघातात बीएमसी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता

  • खार अपघातात अय्यप्पन हरिजन यांचा मृत्यू तर पत्नी जखमी झाली होती

संजय गडदे, मुंबई

मुंबईतल्या खारमध्ये भीषण अपघाताची घटना घडली होती. या अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या अपघात प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली. माजी खासदार आणि निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २८ सप्टेंबरच्या सायंकाळी खार पश्चिममधील सीडी रोड-१६ वा रोड जंक्शनवर भीषण अपघात झाला होता. सुधीर सावंत यांच्या कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली होती. या अपघातामध्ये दुचाकीवरून प्रवास करणारे बीएमसी कर्मचारी अय्यप्पन सेल्वराज हरिजन (४१ वर्षे) यांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर माजी खासदार सुधीर सावंत यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात होती.

Mumbai News: मुंबईत माजी खासदाराविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ
Accident: भीषण अपघात! कार खोल दरीत कोसळली; ५ जणांचा जागीच मृत्यू

या अपघातामध्ये अय्यप्पन यांच्या पत्नी नॅन्सी हरिजन (३७ वर्षे) या जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या अपघातात अन्य एका स्कूटीचालकालाही कारने धडक दिल्याने त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये बीएमसी कर्मचारी अय्यप्पन कारखाली अडकले होते. स्थानिकांनी कार उचलून त्यांना बाहेर काढले पण उपचारादरम्यान अय्यप्पन यांचा मृत्यू झाला.

Mumbai News: मुंबईत माजी खासदाराविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ
Accident: रस्त्यावर CCTV लावत असताना भयंकर अपघात, भरधाव ट्रकने एचआर मॅनेजरसह ६ जणांना चिरडलं

अखेर खार पोलिसांकडून सुधीर सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. BNS कलम १०६(१) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत कारवाई त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या अपघातानंतर रक्तदाब वाढल्याने सुधीर सावंत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डिस्चार्जनंतर त्यांच्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.

Mumbai News: मुंबईत माजी खासदाराविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ
Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com