नेस्कोमध्ये तरुणाईला ड्रग्जचा 'कुरिअर डोस'; कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?

Mumbai NESCO Concert: नेस्को सेंटरमधील म्युझिक कॉन्सर्टमध्ये दोन जणांचा ड्रग्जच्या ओव्हरडोसनं मृत्यू झाला. मात्र कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं होतं? ड्रग्जच्या ओव्हरडोसनंतर बचावलेल्या तरुणीनं जबाबात कोणते धक्कादायक खुलासे केलेत. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Mumbai NESCO Concert:
Police investigate after drug overdose deaths at NESCO concert raise serious concerns over event security.saam tv
Published On

नेस्को सेंटरच्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणानं आता एक नवं वळण घेतलयं. दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेलं ड्रग्ज नेस्को सेंटरमध्ये कुठून आलं याची धक्कादायक माहिती समोर आलीय. मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी पोलिसांच्या नाकाखाली सुरु असणाऱ्या या कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज पोहचवण्यासाठी आरोपींनी काय शक्कल लढवली होती, पाहूयात.

ड्रग्ज प्रकरणातील मुख्य संशयित आनंद पटेल एका अॅपच्या माध्यमातून रॅकेट चालवत होता. पोलिसांनी प्रतीक पांडे या आरोपीला अटक केल्यानंतर आनंद पटेलचं नाव उघड झालं..आणि प्रतीकच्या जबाबावरून पोलिसांनी आनंद पटेलला कल्याणमधून अटक केली..मात्र कल्याणमध्ये असणारा संशयित आनंद पटेल गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये कुरिअरद्वारे तरुणांना ड्रग्ज पुरवठा करत होता.

Mumbai NESCO Concert:
Nesco Drug Party: पोरगा ड्रग्जमाफिया, बाप रेशन माफिया; नेस्को पार्टीत ड्रग्ज पुरवणाऱ्या पटेलचा बाप निघाला अट्टल गुन्हेगार

दुसरीकडे या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा जबाब आता समोर आलाय. ड्रग्ज घेतल्यानंतर कॉन्सर्टमध्ये तिघाजणांना अस्वस्थ वाटतं होतं.. त्यातील दोघांचा मृत्यू झाला. मात्र याप्रकरणात वाचलेल्या तरुणीनं पोलिसांना दिलेला जबाब अंगावर शहारा आणणारा आहे. "रौनकने मला एक पिवळी गोळी दिली होती, ती घेतली आणि त्यानंतर मला काहीच आठवत नाही. जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी थेट रुग्णालयात होते. कॉन्सर्टमध्ये अंधार, भरपूर गर्दी आणि कमी पोलीस बंदोबस्तामुळे ड्रग्ज सेवन करणं सोपे होते. कॉन्सर्टमधील काही विद्यार्थ्यांनी यापूर्वीही ड्रग्ज घेतले होते.

Mumbai NESCO Concert:
Pune drug racket: धक्कादायक! पुण्यात डिलिव्हरी ॲपचा वापर करून अमली पदार्थांची विक्री, पोलिसांनी केला भंडाफोड

दरम्यान या कॉन्सर्टला इन्फ्लूएंसर ऑरीही उपस्थित असल्याचं समोर आलय. त्यात नेस्को सेंटरमधील 9 टाईम 9 या कॉन्सर्टचं रेट कार्ड सर्वसामान्यांचे डोळे पांढरे करणारं आहे. म्य़ुझिक कॉन्सर्टमधील स्टेज टेबलचं तिकीट तब्बल 3 लाख रुपयाचं होतं. तर VIP टेबल 1 ते दीड लाख रुपये आणि बॅकस्टेज तिकीट 6 हजार रुपये होतं. त्याशिवाय VIP पास अडीज हजारापासून ते 10 हजार रुपये होतं.

मुंबईसारख्या ठिकाणी रिसॉर्ट, फॉर्महाऊसवर धाडी टाकून पोलीस ड्रग्ज पार्टीचे कारनामे उघड करत असतात. मात्र नेस्को सेंटरसारख्या मोठ्या मैदानांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात ड्रग्जची विक्री सर्रासपणे कशी होते. खासगी सुरक्षा असूनही ड्रग्ज कार्यक्रमात कसे नेण्यात आले. मुंबईसारख्या शहरात म्युझिक कॉन्सर्टच्या नावाखाली रेव्ह पार्टीचा नवा ट्रेंड फोफावतोय का? असे प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com