Mumbai Metro 5A: आनंदाची बातमी! लोकलच्या गर्दीतून सुटका होणार, उल्हासनगरपर्यंत धावणार 5A मेट्रो; कधीपर्यंत होणार सुरू?

Ulhasnagar Metro 5A: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता कल्याण-ठाणे-भिंवडीला जोडणारी मेट्रो ५ अ उल्हासनगरपर्यंत धावणार आहे. या मेट्रो ५ अ मार्गिकेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.
Mumbai Metro
Mumbai MetroSaam Tv
Published On
Summary

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

मुंबई मेट्रो ५अचा विस्तार होणार

उल्हासनगरपर्यंत धावणार मेट्रो

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.आता मुंबईकरांना आणखी एक मेट्रो मिळणार आहे. मुंबई मेट्रो मार्गिका 5A टप्पा एक आणि टप्पा दोनला मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली आहे. काल मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय झाला. याबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय झाले आहेत.

Mumbai Metro
Water Metro : मुंबईकरांचा प्रवास आता लाटांवरून! 'वॉटर मेट्रो'साठी फडणवीसांचा मास्टरप्लॅन, ३ टप्प्यांत बदलणार शहराचा चेहरा

मुंबई मेट्रो ५ अ होणार लवकरच सुरु (Mumbai Metro 5A Work Update)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मुंबई मेट्रो मार्गिका ५ अ टप्पा एक आणि टप्पा २ सुरु होणार आहे. यासाठी १८,१३०.५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या मार्गाला सध्या मंजुरी मिळाली आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे.

मुंबई मेट्रो ५अ ही मार्गिका ३४.२१ किमी लांब असणार आहे. ज्यामध्ये १९ स्थानकांचा समावेश आहे. दोन टप्प्यांमध्ये ही मार्गिका सुरु करण्यात येणार आहे. यातील पहिला टप्पा कापूरबावडी ते धामणकर नाका आणि दुसरा टप्पा धामणकर नाका ते दुर्गाडी असणार आहे.

मेट्रो ५अ दुर्गाडी - कल्याण – उल्हासनगर ठिकाणांना जोडणार आहे. यामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगरमधील प्रवाशांना फायदा होणार आहे. एकूण ६९ लाख प्रवाशांना या मेट्रोचा फायदा होणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ जवळपास अर्धा होणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक परवानगीसाठी केंद्र सरकार आणि संबंधित विभागाकडे वेगाने कार्यवाही करावी, असं त्यांनी सांगितलं आहे.

Mumbai Metro
Metro 9 And Metro 2B: मुंबईकरांची प्रतिक्षा कायम! मेट्रो ९ अन् 2B चे उद्घाटन लांबणीवर; कारण काय?

मेट्रोमुळे ठाणे-कल्याण-भिवंडी आणि पुढे उल्हासनगरच्या प्रवाशांना फायदा होणार आहे. या मेट्रोचे काम लवकरचा लवकर पूर्ण होईल. आधी ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो ५ २४.९ किमी लांबीची होती. आता यात १० किमीचा विस्तार करण्यात आला आहे. मेट्रो ५ च्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यानंतर दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण केले जाईल. याबाबत बुधवारी निर्णय जारी करण्यात आला.

Mumbai Metro
Thane Metro 10: घोडबंदरच्या वाहतूक कोंडीची कटकट संपणार; मेट्रोसोबतच आणखी एक प्रोजेक्ट, वाचा सरकारचा मास्टरप्लान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com