Metro 9 And Metro 2B: मुंबईकरांची प्रतिक्षा कायम! मेट्रो ९ अन् 2B चे उद्घाटन लांबणीवर; कारण काय?

Metro 9 And Metro 2B Innugartion Date: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव टप्प्याचे आणि मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले या टप्प्याचे उद्घाटन लांबणीवर गेले आहे.
Metro 9 And Metro 2B
Metro 9 And Metro 2BSaam Tv
Published On
Summary

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी

मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव टप्प्याचे उद्घाटन लांबणीवर

मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले या टप्प्यासाठीही पाहावी लागणार वाट

संजय गडदे, साम टीव्ही प्रतिनिधी

रोज लाखो मुंबईकर मेट्रोने प्रवास करतात. मेट्रोने प्रवास करणे खूप सोपे आणि जलद आहे. मुंबईत मेट्रोचे जाळे झपाट्याने पसरत आहे. दरम्यान, आता दोन मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण पुन्हा लांबणीवर गेले आहे. मुंबईकरांसाठी महत्त्वाच्या असलेल्या दोन मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आहे.

Metro 9 And Metro 2B
Navi Mumbai Metro: नवी मुंबईत आणखी एक मेट्रो धावणार! तळोजा ते खांदेश्वर, असा असणार मार्ग, स्थानके कोणती? वाचा

मेट्रोच्या उद्घाटनाचा कार्यक्रम शुक्रवार (३ एप्रिल) रोजी होणार होता, मात्र आता तो सोमवार (६ एप्रिल) रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव हा टप्पा आणि मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले हा टप्पा मागील तीन ते चार महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

दोन मेट्रोची मुंबईकरांना प्रतिक्षा

या दोन्ही टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून संचालनासाठी आवश्यक सुरक्षा प्रमाणपत्रही मिळाले आहे. तरीही लोकार्पण रखडल्यामुळे सुविधा उपलब्ध असूनही मुंबईकरांना मेट्रो सेवेचा लाभ घेता येत नव्हता. या दोन मेट्रो टप्प्यांच्या लोकार्पणासोबतच पॉड टॅक्सी प्रकल्पाचे भूमिपूजन आणि ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या भुयारीकरणाच्या कामालाही सुरुवात होणार होती. त्यासाठी राज्य सरकारने ३ एप्रिलची तारीख निश्चित केली होती आणि त्यानुसार एमएमआरडीएने (MMRDA) तयारीही सुरू केली होती.

मेट्रोचे उद्घाटन कधी होणार? (Metro 9 And Metro 2B Innagauration Date)

मात्र, सर्व तयारी अंतिम टप्प्यात असतानाच बुधवारी उशीरा रात्री राज्य सरकारने शुक्रवारचे सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले आहे.

आता हे सर्व कार्यक्रम सोमवार (६ एप्रिल) रोजी होणार असून त्यानंतर मंगळवार (७ एप्रिल) पासून या दोन मेट्रो मार्गिकांवर नियमित सेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मिरा-भाईंदर आणि पूर्व उपनगरातील प्रवाशांना मेट्रोसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Metro 9 And Metro 2B
Pune Metro : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोबाबत अपडेट, वाचा मेट्रो ३ कधी सुरू होणार?

दरम्यान, कार्यक्रम पुढे ढकलण्यामागचे अधिकृत कारण जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या निवडणूक प्रचारामुळे काही नेते व्यस्त असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Metro 9 And Metro 2B
Mumbai Metro: गुड न्यूज! ३ एप्रिलपासून मुंबईत २ नव्या मार्गावर मेट्रो धावणार, प्रवासाचा वेळ वाचणार; कुठून कसा कराल प्रवास?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com