Thane Metro 10: घोडबंदरच्या वाहतूक कोंडीची कटकट संपणार; मेट्रोसोबतच आणखी एक प्रोजेक्ट, वाचा सरकारचा मास्टरप्लान

Thane-Ghodbunder Metro 10: घोडबंदरची वाहतूक कोंडी आता कायमची फुटणार आहे. गायमुख ते घोडबंदर मेट्रोचे काम लवकरच सुरु होणार आहे. याचसोबत घोडबंदर रस्त्याचे रुंदीकरणदेखील होणार आहे.
Thane Metro 10
Thane Metro 10Saam Tv
Published On
Summary

मेट्रो १० च्या कामाला सुरुवात

गायमुख ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (घोडबंदर) मेट्रोचं काम सुरु होणार

घोडबंदरची वाहतूक कोंडी फुटणार

ठाणेकरांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. आता लवकरच घोडबंदरमधून मेट्रो धावणार आहे. यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. प्रवाशांना काहीच त्रास होणार नाही.ठाणे आणि मीरा भाईंदर परिसरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. हीच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी गायमुख ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (घोडबंदर) मेट्रो सुरु करणार आहे. याचसोबत हा रस्ता रुंदीकरणालादेखील मंजुरी मिळाली आहे.

Thane Metro 10
Mumbai Metro: गुड न्यूज! ३ एप्रिलपासून मुंबईत २ नव्या मार्गावर मेट्रो धावणार, प्रवासाचा वेळ वाचणार; कुठून कसा कराल प्रवास?

मेट्रो १०चे काम लवकरच सुरु होणार (Thane Ghodbunder Metro 10)

मेट्रो १० प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. काशीगाव ते दहिसर चेक नाका या महत्त्वाच्या जोडण्याचे काम सुरु आहे. यानंतर पुढच्या आठवड्यात गायमुख ते छत्रपती शिवाजी महाराज चौक यासाठी मेट्रो प्रकल्पाची निविदा सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्र्‍यांनी दिली आहे. हा मार्ग ९७ किमी असणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर एमएमआरडीएच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.

दहिसर ते काशीगाव या मेट्रो मार्गाचा विस्तार करुन तो पुढे गायमुखपर्यंत नेण्यात येणार आहे. यासाठी ८,५५३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.पुढील ३-४ महिन्यात कामाला सुरुवात होणार आहे. २०२९ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

Thane Metro 10
Mumbai metro: मुंबईकरांसाठी खुशखबर! मेट्रो ९ आणि २ बी सुरू कधीपासून धावणार? अधिकृत तारीख आली समोर

रस्ता रुंदीकरणाचेही काम होणार

या मेट्रोच्या कामाला सुरुवात होणार आहे. घोडबंदरवरील वाहतूक कोंडी लक्षात घेता रस्ता रुंदीकरणाचा विचार करण्यात आला आहे. हा रस्ता ३० मीटरवरुन ६० मीटरपर्यंत रुंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडी होणार नाही.

Thane Metro 10
Mumbai Metro: मुंबई मेट्रोचा 337 किमीपर्यंत विस्तार होणार; उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला भविष्यातील मास्टर प्लॅन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com