मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai Malvani Dahi Handi Celebration Accident: मुंबईतील मालाड पश्चिमच्या मालवणीमध्ये दहीहंडी उत्सवाला गालबोट लागला असून विटांचा कॉलम कोसळून ७ वर्षीय रुद्र कदमचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Mumbai Dahi Handi Tragedy
Mumbai Dahi Handi Tragedysaam tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईतील मालाड पश्चिम परिसरातील मालवणीमध्ये दहीहंडी उत्सवाला गालबोट लागलं आहे. दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमादरम्यान विटांचा कॉलम अचानक कोसळून त्याखाली दबल्याने ७ वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रुद्र कदम असं मृत मुलाचं नाव आहे. मालाड पश्चिमेतील चिकुवाडी, मालवणी परिसरातील एकता वेल्फेअर सोसायटीमध्ये स्थानिक मुलांकडून दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी दहीहंडीसाठी झाडाला आणि तळमजल्यावरील विटांच्या कॉलमला दोरी बांधण्यात आली होती. दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम सुरू असतानाच हा विटांचा कॉलम अचानक कोसळला.

Mumbai Dahi Handi Tragedy
गणेशोत्सवाच्या उत्साहाला गालबोट, २२ फुटी बाप्पाची मूर्ती अचानक कोसळली, २ जणांचा मृत्यू, ५ गंभीर

या दुर्घटनेत कॉलमखाली दबून ७ वर्षीय रुद्र कदम गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. घटनेनंतर रुद्रला तातडीने मालवणी जनरल रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच वॉर्ड कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Mumbai Dahi Handi Tragedy
मुंबईच्या २४ वर्षीय स्टार बायकरचा मृत्यू, १००० किमी दूर झाला भयंकर अपघात; बातमी ऐकून कुटुंबीयांना मोठा धक्का

दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचा गंभीर प्रश्न आता उपस्थित झाला आहे. उत्सवाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, तसेच धोकादायक पद्धतीने कॉलमला दोरी बांधण्यास परवानगी कशी देण्यात आली, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com