Mumbai Rain: मुंबईत पावसाचा हाहाकार, रेल्वेच्या तिन्ही मार्गांना फटका, वाहतूक अर्धा तास उशीराने

मुंबईत मुसळधार पावसामुळे लोकल सेवा उशिराने धावत असून नालासोपारा स्थानक पाण्याखाली गेलं आहे. शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलीये. तर मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने अनेक गाड्या रद्द व मार्ग बदलण्यात आले आहेत.
Mumbai Local
Mumbai Rain Local Train UpdatesSaam TV
Published On

मुसळधार पावसाने सोमवारी मुंबई आणि उपनगरांना अक्षरशः झोडपून काढलं असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही उपनगरीय रेल्वे मार्गांवरील लोकल सेवांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये पश्चिम रेल्वेवरील लोकल १५ ते २० मिनिटं, मध्य रेल्वेवरील गाड्या २० ते २५ मिनिटं, तर हार्बर मार्गावरील लोकल १५ ते २० मिनिटं उशिराने धावत असल्याने लाखो प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागतंय.

नालासोपारा रेल्वे स्टेशन पाण्याखाली

नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरातील रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रेल्वे वाहतुकीवर सर्वाधिक परिणाम झालाय. या मार्गावरील लोकल गाड्या सध्या १० ते १५ मिनिटं उशिराने धावत असून काही गाड्यांचे वेळापत्रकही विस्कळीत झालंय. परिणामी अनेक प्रवासी स्थानकांवर अडकून पडले आहेत तर काहींनी वाढती गैरसोय लक्षात घेऊन आपल्या घराकडे परतण्याचा निर्णय घेतला.

Mumbai Local
झाड कोसळून आणखी दोघांचा मृत्यू; मुंबईकरांचा वाली कोण? मुर्दाड महापालिकेला कधी जाग येणार?

रेल्वे प्रशासनाने वाहतूक शक्य तितकी सुरळीत ठेवण्यासाठी काही लोकल गाड्या फास्ट ट्रॅकवरून चालवण्यास सुरुवात केलीये. मात्र सततच्या पावसामुळे परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेच्या अद्ययावत माहितीसहच प्रवास करण्याचं आवाहन करण्यात आलंय.

दरम्यान, हवामान विभागाने मुंबईसाठी अतिवृष्टीचा इशारा दिल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील सर्व सरकारी, खासगी, महापालिका तसेच अनुदानित शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असं आवाहन प्रशासनाने केलंय.

Mumbai Local
School Holiday: कोणकोणती शहरं आणि जिल्ह्यात आज शाळा- कॉलेजला सुट्टी, जाणून घ्या एका क्लिकवर...

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

मुंबई आणि पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. कर्जत-लोणावळा घाटातील ठाकूरवाडी आणि मंकी हिल स्थानकांदरम्यान दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालीये. या परिस्थितीमुळे मध्य रेल्वेने अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द केल्या असून काही गाड्यांचे मार्गही बदलले आहेत.

Mumbai Local
Mumbai-Pune Expressway: अतिवृष्टीचा फटका! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प, मिसिंग लिंकही बंद; वाहनांच्या लांबच लांब रांगा, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com