Mumbai-Pune Expressway: अतिवृष्टीचा फटका! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प, मिसिंग लिंकही बंद; वाहनांच्या लांबच लांब रांगा, पाहा VIDEO

Mumbai-Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प झाली. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळली. दोन्ही मार्गिकेवरील वाहतूक ठप्प झाल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
Mumbai-Pune Expressway: अतिवृष्टीचा फटका! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प, मिसिंग लिंकही बंद; वाहनांच्या लांबच लांब रांगा, पाहा VIDEO
Mumbai-Pune Expressway Traffic JamSaam Tv
Published On
  • मुसळधार पावसाचा फटका मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेला बसला

  • मुसळधार पावसामुळे मिसिंग लिंक बंद

  • लोणावळा घाटात मोठी वाहतूक कोंडी

  • दरड कोसळल्यामुळे मुंबई- पुणे महामार्ग बंद

सचिन जाधव, पुणे

पुणे जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. या मुसळधार पावसाचा फटका मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला बसला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर मिसिंग लिंक देखील बंद आहे. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळली. त्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. एकाच ठिकाणी बराच वेळ अडकून पडल्यामुळे प्रवेशांचे हाल झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक बंद झाली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे देखील वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या लेनवर मिसिंग लिंकवरील दुसऱ्या बोगद्याच्या आधी दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली आहे. सुदैवाने ही दरड कोसळत असताना कुठलंही वाहन त्या ठिकाणाहून जात नसल्याने मोठी दुर्घटना टळली. खबरदारी म्हणून मुंबईहून पुण्याकडे जाणारी लेन ही महामार्ग पोलिसांनी बंद केली आहे.

तसेच एक्सप्रेस वे वरील बोरघाटामध्ये देखील पाणी साठल्याने तोही मार्ग बंद झाला आहे. पुणे जिल्हात जोरदार पाऊस होत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे ३ तासांपासून ठप्प झाला आहे. लोणावळा घाटामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांनी प्रवास टाळा असे आवाहन केले जात आहे.

दरम्यान, दरड कोसळणे व सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई–पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक गंभीरपणे प्रभावित झाली आहे. पुणे- मुंबई तसेच मुंबई- पुणे या दोन्ही दिशेची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे- मुंबई किंवा मुंबई- पुणे असा प्रवास करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. अत्यावश्यक प्रवास असल्यास कृपया प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या वाहतूकविषयक सूचना आणि अद्ययावत माहितीनुसारच प्रवास करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com