Mumbai Local Train: मोठी बातमी! पश्चिम रेल्वे मार्गावर ओव्हरहेड वायर तुटली; मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

पश्चिम रेल्वेच्या वैतरणा आणि विरारच्यामध्ये अप लाइनवर ओव्हरहेड वायर तुटल्याचं वृत्त समोर आलं आहे.
Mumbai Local Train
Mumbai Local TrainSaam tv
Published On: 

Mumbai News: पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी हाती आली आहे. पश्चिम रेल्वेच्या वैतरणा आणि विरारच्यामध्ये अप लाइनवर ओव्हरहेड वायर तुटल्याचं वृत्त समोर आलं आहे. यामुळे पश्चिम रेल्वेची मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे . (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. पश्चिम रेल्वेच्या वैतरणा आणि विरारच्या मध्ये अप लाइनवर ओव्हरहेड वायर तुटली आहे. ही ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Mumbai Local Train
Ambernath Fire News: अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीला मोठी आग; घटनेत एका कामगाराचा मृत्यू, ४ जण जखमी

वैतरणा आणि विरारच्या मध्ये वाढीव कसराळीच्या मध्ये नवीन ट्रॅकचं काम सुरू आहे. या ट्रॅकचं काम करताना चालू ट्रॅकर पोल पडल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबविण्यात आली आहे. तर गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेन सुरू आहेत. गेल्या अर्धा तासांपासून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेन बंद आहेत.

नेमकं काय घडलं?

विरार-तरणा रेल्वे स्थानकादरम्यान वादळी वाऱ्यामुळे ओव्हरहेड वायरचे पोल तुटल्याची घटना आज दुपारी घडली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे काल रात्रीपासूनच वादळी वारा सुरु झाला होता. याचा फटका आता रेल्वेला बसला आहे. पश्चिम रेल्वेच्या विरार व वैतरणा रेल्वे स्थानकादरम्यान वादळी वाऱ्यामुळे विजेचा पोल पडला असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Mumbai Local Train
Pre Monsoon Rains: धुळ्यात पूर्व मौसमी पावसाचा बळी! वादळी वाऱ्याने झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू

लोकल, माल गाड्या, लांब पल्ल्याच्या ट्रेन सेवा विस्कळल्या आहेत. ता हे पोल लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी रेल्वेची यंत्रणा कामाला लागली असून काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.