Pre Monsoon Rains: धुळ्यात पूर्व मौसमी पावसाचा बळी! वादळी वाऱ्याने झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू

Victim of Pre Monsoon Rains In Dhule: प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे ही दुर्घटना घडून एकाचा बळी गेला असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.
Victim of Pre Monsoon Rains In Dule
Victim of Pre Monsoon Rains In Dulesaam tv
Published On

Dhule Latest News: पूर्व मौसमी पावसामुळे धुळ्यात एका जणाचा बळी गेला आहे. धुळ्याच्या पिंपळनेरमध्ये झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान नागरिकांनी हा प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा बळी असल्याचा आरोप केला आहे.

ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली तिथे रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. यासाठी प्रशासनाकडून खोदकाम करण्यात आले आहे. या खोदकामादरम्यान झाडाच्या दोन्ही बाजू कोरण्यात आल्या. त्यामुळे झाडाची मुळे सैल झाली होती. त्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात हे झाड कोसळलं आणि ही दुर्घटना घडली.

Victim of Pre Monsoon Rains In Dule
Shiv Sena And BJP Conflict: 'याचे लाड करायची काय गरज?', श्रीकांत शिंदेंच्या राजीनाम्याच्या वक्तव्यावर भाजप नेते थेट बोलले

यासंदर्भात एक दिवस आधीच संबंधित प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सुचित केले असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे ही दुर्घटना घडून एकाचा बळी गेला असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.

निफाड तालुक्याला वादळी पावसाचा तडाका

निफाड तालुक्यात आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मान्सून पूर्व वादळी पावसाने हजेरी लावली. यामुळे नाशिक ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर अनेक ठिकाणी झाडं कोसळ्याच्या घटना घडल्या. यामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. पिंपळस गावाजवळील जाहिरातीचे फ्लेक्स देखील महामार्गावर कोसळे होते. याशिवाय कोठुरे फाट्याजवळ एक झाड पडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. (Breaking News)

Victim of Pre Monsoon Rains In Dule
Praful patel NCP Working President: गोंदिया नगरपरिषदेचे अध्यक्ष ते माजी केंद्रीय मंत्री; कसा आहे शरद पवारांचे निकटवर्तीय प्रफुल्ल पटेल यांचा राजकीय प्रवास?

शेतकामांना गती

निफाड येथील शांतीनगर चौफुलीवर वृक्ष उन्मळून पडल्याने नागरिकांची तारांबळ झाली, तर लासलगाव येथील कांदा व्यापाऱ्याचे शेड कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आज झालेल्या वादळी पावसामुळे शेती कामांना वेग येणार आहे. तसेच वाढत्या उकाड्यापासून निफाडकर नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. (Latest Political News)

पालखी सोहळ्याच्या दिवशी पाऊस

पुण्याच्या ओतुर परिसरात देखील मान्सून पूर्व पावसाचं आगमन झालं. आज दुपारी ओतुर परिसरात पाऊसाच्या सरी कोसळ्या. आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याच्या दिवशी पावसाचं आगमन झाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com