Shiv Sena And BJP Conflict: 'याचे लाड करायची काय गरज?', श्रीकांत शिंदेंच्या राजीनाम्याच्या वक्तव्यावर भाजप नेते थेट बोलले

'याचे लाड करायची काय गरज?', श्रीकांत शिंदेंच्या राजीनाम्याच्या वक्तव्यावर भाजप नेते थेट बोलले
Shrikant Shinde
Shrikant ShindeSaam Tv
Published On

>> अभिजित देशमूख

Bjp Shiv Sena Alliance Dispute: ''काही नेते युतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत'', असं शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत. यावर आता भाजप नेत्यानं त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार म्हणाले आहेत की, ''युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे काम पोलीस अधिकारी करतोय. श्रीकांत शिंदेने राजीनामा देण्याची भाषा केली, ती अत्यंत चुकीची आहे.''

ते म्हणाले की, श्रीकांत शिंदे यांनी राजीनामा देण्याची गरज नाही. त्यांचं कार्य उत्तम आहे. हा अधिकारी खासदार श्रीकांत शिंदे, भाजप शिवसेना युतीपेक्षा मोठा आहे का? याचे लाड करण्याचे काय गरज?'', असा सवाल करत त्याच्यावर श्रीकांत शिंदे यांनी कारवाई करावी त्याची इथून हकलपट्टी करा, अशी मागणी नरेंद्र पवार यांनी केली आहे.

Shrikant Shinde
Jayant Patil On Ajit Pawar: 'अजित पवार यांच्यावर कोणताही अन्याय झाला नाही', जयंत पाटील यांचं वक्तव्य

कोण आहेत हे पोलीस अधिकारी?

कल्याण लोकसभा मतदारसंघात मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्यावरून शिवसेना-भाजपमध्ये युतीत वादाची ठिणगी पडली आहे. भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बागडे यांची बदली होईपर्यंत शिवसेनेला सहकार्य करायचे नाही, असा ठराव करण्यात आला.  (Latest Marathi News)

तर त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी केंद्रात पुन्हा भाजप- शिवसेना युती आणि मित्र पक्षाचे सरकार स्थापन करणे हेच आमचे ध्येय आहे. त्या दिशेने आम्ही करत असलेल्या कामांना जर कुणाचा विरोध असेल, कुणाला पोटदूखी होत असेल आणि युतीमध्ये जर विघ्न निर्माण होत असेल तर मी माझ्या पदाचा राजिनामा देण्याची तयारी आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती.  (Maharashtra Politics)

Shrikant Shinde
Sanjay Raut on NCP: राष्ट्रवादीत बदलाचा महाविकास आघाडीवर परिणाम? संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

यानंतर शिवसेना शिंदे गट व भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना प्रत्युत्तर दिलंय. पवार यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी आम्ही सर्व पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com