Ambernath Fire News: अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीला मोठी आग; घटनेत एका कामगाराचा मृत्यू, ४ जण जखमी

अंबरनाथच्या वडोळ एमआयडीसीत रासायनिक कंपनीला ही आग लागली आहे.
Ambernath Fire News
Ambernath Fire NewsSaam tv
Published On

Ambernath News: अंबरनाथमध्ये एका रासायनिक कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. अंबरनाथच्या वडोळ एमआयडीसीत रासायनिक कंपनीला ही आग लागली आहे. कंपनीला लागलेल्या आगीने मोठा पेट घेतला आहे. या आगीचे धुराचे लोट परिसरात पसरले आहे. आग लागल्याची माहिती कळताच अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचलं आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथच्या वडोळ गाव एमआयडीसीत रासायनिक कंपनीला आज दुपारी मोठी आग लागली. ब्लु जेट हेल्थ केअर असं कंपनीचं नाव आहे.कंपनीतील एक रियाकटरचा स्फोट झाला. त्यानंतर कंपनीला मोठी आग लागली. अग्निशमन दल ,पोलीस,रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले आहे.

या आगीत चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या आगीच्या धुराचे लोट कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावर पसरले आहे.

Ambernath Fire News
Pre Monsoon Rains: धुळ्यात पूर्व मौसमी पावसाचा बळी! वादळी वाऱ्याने झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू

नेमकं काय घडलं?

अंबरनाथ पश्चिम भागात एमआयडीसी भागात आग लागल्याची घटना घडली आहे. ब्लु जेट हेल्थ केअर कंपनीला आग लागली आहे. शनिवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. आग लागण्यापूर्वी कंपनीत कामगार काम करत होते.

कंपनीतील रियाक्टरचा स्फोट झाल्याने आगीची घटना घडली. अग्निशामक दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी देखील घटनास्थळी पोहोचले. रुग्णावाहिकाही घटनास्थळी आहे.

आग लागल्याची घटना घडताच कामगार कंपनीतून बाहेर पडले. या आगीत ४ कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या आगीमुळे कामगार आणि नागरिकांची एकच धावपळ उडाली. या आगीत जखमी झालेल्या नागरिकांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या आगीमुळे अजूनही काही जण जखमी झाल्याचे बोलले जात आहे. या आगीत अडकलेल्या लोकांना अद्याप बाहेर काढले नसल्याचे बोललं जात आहे. घटनास्थळी अग्निशामक दल आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी आहे.

Ambernath Fire News
Navi Mumbai News : जलवाहिनी फुटली; नवी मुंबई, कामोठेतील पाणीपुरवठ्यावर हाेणार आज मोठा परिणाम

आगीच्या घटनेत एका कामगाराचा मृत्यू

अंबरनाथच्या कंपनीला आग लागल्याच्या घटनेत चार जण जखमी झाले आहेत. या आगीतील जखमींना उल्हासनगरच्या क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत सूर्यकांत झिमान या कामगाराचा मृत्यू झाला आहे. अग्निशामक दलाने युद्ध पातळीवर आगीवर नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न सुरू केल आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com