
- सिद्धेश म्हात्रे
Navi Mumbai News : नवी मुंबईला पाणीपुरवठा (navi mumbai water supply) करणाऱ्या मोरबे धरण प्रकल्पाची (morbe dam) जलवाहिनी फुटल्याने आज (शनिवार, ता. 10 जून) संध्याकाळी नवी मुंबईत कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. (Maharashtra News)
नवी मुंबई महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने दिलेल्या माहितीनूसार आज सकाळी ११ च्या सुमारास आदई गावा नजीक मोरबे धरण प्रकल्पाची २०२४ मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटली.
दरम्यान मुख्य जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. ही जलवाहिनी बसविण्यासाठी तसेच दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे.
यापुर्वी बुधवारी मान्सूनपूर्व कामासाठी महापालिकेकडून पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यानंतर कमी दाबाने पाणीपुरवठा केला गेला. मात्र आजही अनेक भागात पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यातच आता जलवाहिनी फुटल्याने आज (शनिवार कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे.
आजच्या घटनेमुळे संपूर्ण नवी मुंबईसह खारघर कामोठे या परिसरातील पाणीपूरवठ्यावर परिणाम होणार असल्याने नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा महापालिकेने केली आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.