मुंबईकरांचा रविवारचा प्रवास खोळंबणार! ट्रान्स-हार्बर सेवा बंद, मध्य रेल्वेवर ५ तासांचा मेगा ब्लॉक; 'या' गाड्यांचे मार्ग बदलले

Mumbai Local Train Mega Block: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर रविवारी ५ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून ट्रान्स-हार्बर लोकल सेवा ठाणे-वाशी/नेरुळ/पनवेलदरम्यान बंद राहणार आहे. अनेक एक्सप्रेस गाड्यांना विलंब होणार.
मध्य-हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक, पश्चिम मार्गावर शॅडो ब्लॉक, वाचा सविस्तर
Mumbai Local Train Mega Block Updatesaam tv
Published On

Mumbai local train mega block : रविवारी जर तुम्ही मध्य रेल्वे किंवा ट्रान्स-हार्बर मार्गावरून प्रवासाचे नियोजन करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे रुळांची दुरुस्ती, अभियांत्रिकी आणि तांत्रिक देखभालीच्या कामासाठी उपनगरीय मार्गांवर मोठा 'मेगा ब्लॉक' घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे अनेक लोकल फेऱ्या आणि लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

रविवारचा मेगा ब्लॉक विद्याविहार ते ठाणे स्थानकादरम्यान ५ व्या आणि ६ व्या मार्गावर सकाळी ८.०० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत असेल. या काळात लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडे जाणाऱ्या तसेच येणाऱ्या अनेक मेल-एक्सप्रेस गाड्या फास्ट ट्रॅकवर वळवण्यात येणार आहेत. यामुळे नेत्रावती, गोदान, सिंहगड आणि डेक्कन क्वीनसारख्या महत्त्वाच्या गाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिराने धावतील.

दुसरीकडे, ठाणे ते वाशी/नेरुळ/पनवेल दरम्यानच्या अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ५ तासांच्या कालावधीत ठाणे ते नवी मुंबईला जोडणारी ट्रान्स-हार्बर लोकल सेवा पूर्णपणे बंद राहील. मात्र, बेलापूर-उरण मार्गावरील गाड्या रविवारच्या नेहमीच्या वेळापत्रकानुसारच धावतील.

मध्य-हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक, पश्चिम मार्गावर शॅडो ब्लॉक, वाचा सविस्तर
Mumbai Local Train : रेल्वे प्रवाशांनो, रविवारी वेळापत्रक बघूनच बाहेर पडा; मध्य रेल्वेवर फास्ट ट्रेनचे थांबे बदलणार, हार्बरवर काही लोकल रद्द

मेन लाईन/एक्सप्रेस गाड्यांचे मार्ग-परिवर्तन:

खालील 'डाऊन' मेल आणि एक्स्प्रेस गाड्या विद्याविहार स्थानकावर 'डाऊन जलद' मार्गावर वळवल्या जातील आणि ठाणे स्थानकावर पुन्हा ५ व्या मार्गावर वळवल्या जातील; ब्लॉक कालावधीत त्या नियोजित वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिरा धावतील.

• गाडी क्रमांक 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर गोदान एक्सप्रेस

• गाडी क्रमांक 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस - जयनगर एक्सप्रेस

• गाडी क्रमांक 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस - तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस आणि

• गाडी क्रमांक 17222 लोकमान्य टिळक टर्मिनस -काकिनाडा पोर्ट एक्सप्रेस

ब्लॉक कालावधीत खालील 'अप' मेल आणि एक्सप्रेस गाड्या ठाणे स्थानकावर 'अप' जलद मार्गावर वळवल्या जातील आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे जाणाऱ्या गाड्या विद्याविहार स्थानकावर सहाव्या मार्गावर वळवल्या जातील; परिणामी त्या आपल्या गंतव्यस्थानी १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

• गाडी क्रमांक 22226 सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस

• गाडी क्रमांक 11010 पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस

• गाडी क्रमांक 12124 पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन एक्सप्रेस

• गाडी क्रमांक 12126 पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस

• गाडी क्रमांक 12134 मंगळुरू - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस

• गाडी क्रमांक 13201 राजगीर - लोकमान्य टिळक टर्मिनस जनता एक्सप्रेस

• गाडी क्रमांक 17221 काकिनाडा पोर्ट - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

• गाडी क्रमांक 12168 बनारस - लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस

• गाडी क्रमांक 12321 हावडा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई मेल आणि

• गाडी क्रमांक 12812 हटिया - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

मध्य-हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक, पश्चिम मार्गावर शॅडो ब्लॉक, वाचा सविस्तर
मध्य रेल्वेवर २८ ऑगस्टपासून १५ दिवसांचा ब्लॉक, अनेक लोकल अन् एक्सप्रेसच्या वेळेत बदल, पाहा A टू Z माहिती

ट्रान्स-हार्बर लाईन:

ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर लाईनवर सकाळी ११.१० ते सायंकाळी १६.१० वाजेपर्यंत.

ब्लॉकच्या कालावधीत ठाणे आणि वाशी/नेरुळ/पनवेल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर लाईनवरील सेवा बंद राहतील.

सकाळी १०.३५ ते सायंकाळी १६.०७ वाजेपर्यंत ठाणे येथून वाशी/नेरुळ/पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स-हार्बर सेवा रद्द राहतील.

सकाळी १०.२५ ते सायंकाळी १६.०९ वाजेपर्यंत पनवेल/नेरुळ/वाशी येथून ठाणे येथे येणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर सेवा रद्द राहतील. बेलापूर-उरण मार्गावरील गाड्या रविवारच्या वेळापत्रकानुसार धावतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com