मध्य रेल्वेवर २८ ऑगस्टपासून १५ दिवसांचा ब्लॉक, अनेक लोकल अन् एक्सप्रेसच्या वेळेत बदल, पाहा A टू Z माहिती

Titwala Central Railway Block, : टिटवाळा रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी २८ ऑगस्टपासून १५ दिवस रात्रीचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये बदल, रद्द व शॉर्ट टर्मिनेट सेवा जाणून घ्या.
CENTRAL RAILWAY SPECIAL BLOCK
CENTRAL RAILWAY SPECIAL BLOCK Saam tv
Published On

Central Railway 15 day block from August 28 2026 : मध्य रेल्वेवर प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. टिटवाळा रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या कामासाठी २८ ऑगस्टपासून पुढील १५ दिवस विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. दररोज रात्री ५ ते ६ तास चालणाऱ्या या कामामुळे लोकलच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता असून प्रवाशांनी वेळापत्रक तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचे नियमन

• गाडी क्रमांक 11048 गोरखपूर - दादर एक्सप्रेसचे दिनांक २८/२९.०८.२०२६ आणि दिनांक ०१/०२.०९.२०२६ रोजी वासिंद येथे, तसेच दिनांक ३०/३१.०८.२०२६ रोजी आटगाव येथे नियमन केले जाईल.

• गाडी क्रमांक 11044 बलिया - दादर एक्सप्रेसचे दिनांक २९/३०.०८.२०२६ रोजी आटगाव येथे आणि दिनांक ३१.०८.२०२६/०१.०९.२०२६ रोजी वासिंद येथे नियमन केले जाईल.

मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना उशीर होणे

• गाडी क्रमांक 12102 शालीमार - लोकमान्य टिळक टर्मिनस ज्ञानेश्वरी एक्सप्रेस, गाडी क्रमांक 18030 शालीमार - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, गाडी क्रमांक 12810 हावडा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल आणि गाडी क्रमांक 15181 मऊ - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस १० ते २० मिनिटे उशिरा पोहोचतील.

• उशिरा धावणाऱ्या मेल/एक्सप्रेस गाड्या किंवा सुट्टीकालीन विशेष गाड्यांचे मार्ग बदलले जाऊ शकतात किंवा परिचालन आवश्यकतेनुसार त्यांचे नियमन केले जाऊ शकते.

CENTRAL RAILWAY SPECIAL BLOCK
Maratha reservation : मराठा समाजासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! 'या' प्रलंबित मागण्यांवर मोहर; त्वरित मिळणार लाभ

उपनगरीय सेवा रद्द करणे

ब्लॉक कालावधीत टिटवाळा आणि कसारा स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध नसतील.

खालील उपनगरीय सेवा रद्द केल्या जातील:

दिनांक २८.०८.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २२.००, २२.५० आणि २३.४२ वाजता सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - टिटवाळा उपनगरी ट्रेन्स.

दिनांक २९.०८.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.०८ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कसारा उपनगरी ट्रेन.

दिनांक २८.०८.२०२६ रोजी टिटवाळा येथून २१.०० आणि २२.०६ वाजता सुटणाऱ्या टिटवाळा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरी ट्रेन्स.

दिनांक २८.०८.२०२६ रोजी टिटवाळा येथून २३.१४ वाजता सुटणारी टिटवाळा-ठाणे उपनगरी ट्रेन.

२८.०८.२०२६ रोजी आसनगाव येथून २३.०८ वाजता सुटणारी आसनगाव-ठाणे उपनगरी ट्रेन.

उपनगरीय सेवांचे शॉर्ट टर्मिनेशन

दिनांक २८.०८.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २०.५६ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - आसनगाव उपनगरी गाडी टिटवाळा येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.(आसनगावपर्यंत जाणार नाही).

दिनांक २८.०८.२०२६ रोजी डोंबिवली येथून २२.०० वाजता सुटणारी डोंबिवली - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरी ट्रेन आणि कल्याण येथून २२.०६ वाजता सुटणारी कल्याण - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरी ट्रेन ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.(छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत जाणार नाही).

दिनांक २८/२९.०८.२०२६ रोजीच्या शेवटच्या आणि पहिल्या उपनगरी ट्रेन

'डाऊन ईशान्य मार्गावर कसारासाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची उपनगरी ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २२.४७ वाजता सुटेल.

'डाऊन ईशान्य मार्गावर टिटवाळासाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची उपनगरी ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.१६ वाजता सुटेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या 'अप' ईशान्य मार्गावरील ब्लॉकपूर्वीची शेवटची उपनगरी ट्रेन कसारा येथून रात्री २२.०० वाजता सुटेल.

कसाराकडे जाणाऱ्या 'डाऊन' ईशान्य मार्गावरील ब्लॉकनंतरची पहिली उपनगरी ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे ०४.१९ वाजता सुटेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणाऱ्या 'अप' ईशान्य मार्गावरील ब्लॉकनंतरची पहिली उपनगरी ट्रेन कसारा येथून पहाटे ०३.५१ वाजता आणि टिटवाळा येथून पहाटे ०४.३२ वाजता सुटेल.

दिनांक २९/३०.०८.२०२६ (शनिवार/रविवारची रात्र) ते दिनांक ०१/०२.०९.२०२६ (मंगळवार/बुधवारची रात्र) या कालावधीतील ब्लॉकदरम्यान उपनगरीय गाड्यांचे कामकाज

उपनगरीय सेवा रद्द करणे

ब्लॉकच्या कालावधीत टिटवाळा आणि कसारा स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत.

खालील उपनगरीय सेवा रद्द केल्या जातील:

'डाऊन' सेवा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - टिटवाळा उपनगरी ट्रेन: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २२.००, २२.५०, २३.१६ आणि २३.४२ वाजता सुटणाऱ्या उपनगरी ट्रेन्स.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कुर्ला उपनगरी ट्रेन्स: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २०.४१ आणि १०.०० वाजता सुटणाऱ्या.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - आसनगाव उपनगरी ट्रेन्स: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २०.५६ वाजता सुटणारी.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - ठाणे उपनगरी ट्रेन: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०८.०८ वाजता सुटणारी.

कुर्ला - कल्याण उपनगरी ट्रेन: कुर्ला येथून १७.५९ वाजता सुटणारी.

ठाणे - टिटवाळा उपनगरी ट्रेन: ठाणे येथून ०५.३५ वाजता सुटणारी.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कसारा उपनगरी ट्रेन: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.०८ वाजता सुटणारी.

'अप' सेवा

टिटवाळा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरी ट्रेन्स: टिटवाळा येथून ०६.१३, २१.०० आणि २२.०६ वाजता सुटणाऱ्या.

टिटवाळा - ठाणे उपनगरी ट्रेन्स: टिटवाळा येथून २२.२५ आणि २३.१४ वाजता सुटणाऱ्या.

आसनगाव - ठाणे उपनगरी ट्रेन: आसनगाव येथून २३.०८ वाजता सुटणारी.

कल्याण - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरी ट्रेन: कल्याण येथून १९.०२ वाजता सुटणारी. ठाणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरी ट्रेन ठाणे येथून सकाळी ०९.०८ वाजता सुटेल.

टिटवाळा - परळ उपनगरी ट्रेन टिटवाळा येथून सकाळी ०८.०९ वाजता सुटेल.

उपनगरीय सेवांचे शॉर्ट टर्मिनेशन

कल्याण - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरी ट्रेन (कल्याण येथून १९.२६ आणि २२.०६ वाजता सुटणाऱ्या) आणि डोंबिवली - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरी ट्रेन (डोंबिवली येथून २१.०८ वाजता सुटणारी) या गाड्या ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेट केल्या जातील.

दिनांक २९/३०.०८.२०२६ (शनिवार/रविवारची रात्र) ते दिनांक ०१/०२.०९.२०२६ (मंगळवार/बुधवारची रात्र) या कालावधीतील शेवटच्या आणि पहिल्या उपनगरी ट्रेन्स :

ब्लॉकपूर्वी 'डाऊन ईशान्य मार्गावर कसारा येथे जाणारी शेवटची उपनगरी ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री २२.४७ वाजता सुटेल.

ब्लॉकपूर्वी 'अप ईशान्य' मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणारी शेवटची उपनगरी ट्रेन कसारा येथून रात्री २२.०० वाजता सुटेल.

ब्लॉकनंतर 'डाऊन ईशान्य मार्गावर कसारा येथे जाणारी पहिली उपनगरी ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे ०४.१९ वाजता सुटेल.

ब्लॉकनंतर 'अप ईशान्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणारी पहिली उपनगरी ट्रेन कसारा येथून पहाटे ०३.५१ वाजता आणि टिटवाळा येथून ०३.५६ वाजता सुटेल.

CENTRAL RAILWAY SPECIAL BLOCK
Ladki Bahin Yojana : खात्यात इतक्या रूपयांचा हप्ता आला की नाही? लाडक्या बहिणींसाठी मोठे सरप्राईज; आताच बॅलेन्स करा चेक

ब्लॉक कालावधीत, म्हणजेच दिनांक २९/३०.०८.२०२६ (शनिवार/रविवारची रात्र) ते दिनांक ०१/०२.०९.२०२६ (मंगळवार/बुधवारची रात्र) या काळात टिटवाळा पर्यंत जाणाऱ्या सर्व उपनगरी सेवा आसनगावपर्यंत वाढवल्या जातील आणि टिटवाळा येथून सुटणाऱ्या सर्व सेवा आसनगाव येथून सुटतील.

दिनांक २९.०८.२०२६ ते दिनांक ०१.०९.२०२६ या कालावधीत उपनगरीय सेवांचे शॉर्ट टर्मिनेशन / ओरिजिनेशन:

खालील 'डाऊन’ उपनगरीय सेवांचे ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेशन:

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - टिटवाळा वातानुकूलित उपनगरी ट्रेन (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०६.३० वाजता सुटणारी) आणि दादर - टिटवाळा वातानुकूलित सेवा (दादर येथून १५.३३ वाजता सुटणारी)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - टिटवाळा सेवा (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ११.२४ आणि १३.४२ वाजता सुटणाऱ्या)

खालील 'डाऊन' उपनगरीय सेवा कल्याणपर्यंतच चालवल्या जातील:

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - टिटवाळा उपनगरीय सेवा (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०९.२७ आणि १९.४६ वाजता सुटणाऱ्या)

खालील 'अप' उपनगरीय सेवा ठाण्यापासून चालवल्या जातील:

टिटवाळा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वातानुकूलित उपनगरीय सेवा (ठाणे येथून ०९.२२ आणि १७.२४ वाजता सुटणाऱ्या)

टिटवाळा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरीय सेवा (ठाणे येथून ०७.३३, १३.०८ आणि १६.२३ वाजता सुटणाऱ्या)

खालील 'अप' उपनगरीय सेवा कल्याणपासून चालवल्या जातील:

टिटवाळा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरीय सेवा (कल्याण येथून १०.३६ आणि २०.५५ वाजता सुटणाऱ्या)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com