तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबईकरांना मंगळवारी पहाटे मोठा मनस्ताप सहन करावा लागला. चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या विरार जलद गाड्या १५-२० मिनिटे उशिराने धावत असल्याने रेल्वेस्थानकावर मोठी गर्दी झाली. त्यामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे मोठे हाल झाले. यामुळे प्रवाशांनी चांगलाच संताप व्यक्त केला.
मुंबईची जीवनवाहिनी म्हणून लोकल ट्रेनची ओळख आहे. दररोज लाखो प्रवासी मुंबई लोकलने प्रवास करीत असतात. मुंबईच्या एका टोकावरुन दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी लोकल ट्रेनचा (Mumbai Local Train) प्रवास हा उत्तम पर्याय आहे. मात्र, काही दिवसांपासून याच लोकल ट्रेनच्या सेवेत मोठा खोळंबा होतोय.
कधी मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या (Central Railway) रुळावर पाणी साचतं पाऊस, तर कधी ओव्हर हेड वायर तुटतो. इतकंच नाही तर सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक बिघाडाचा देखील फटका लोकल ट्रेनला बसतो. त्यामुळे कामावर निघालेल्या अनेक प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.
सध्या मुंबईत मुसळधार पाऊस सुरू नसला तरीही आज मंगळवारी पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या विरार जलद गाड्या १५-२० मिनिटे उशिराने सुरू होत्या. परिणामी प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.