यशश्री शिंदे हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी दाऊद शेख याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. कर्नाटकातील गुलबर्गा येथून नवी मुंबईच्या क्राइम ब्रांचने आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. दाऊद शेख व्यतिरिक्त पोलिसांनी आणखी एका व्यक्तीला देखील अटक केली आहे. लवकरच दोघांना मुंबईत आणले जाणार आहे.
नवी मुंबईतील उरण परिसरात यशश्री शिंदे या २२ वर्षीय तरुणीची एकतर्फी प्रेमातून हत्या करण्यात आली होती. उरण-पनवेल महामार्गालगत तिचा मृतदेह आढळून आला होता. आरोपींनी अत्यंत निर्घृणपणे तिच्या शरीरावर वार केले होते. यशश्रीची हत्या दाऊद शेख यानेच केली असावी, असा संशय पोलिसांना आला.
मात्र, हत्येनंतर आरोपी दाऊद शेख हा फरार झाला होता. त्याला पकडण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी संपूर्ण यंत्रणाच कामाला लावली होती. परंतू आरोपी हा वारंवार आपलं लोकेशन बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. गेल्या ४ दिवसांपासून आरोपी सातत्याने आपली ठिकाणे बदलत होता.
अखेर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दाऊदला कर्नाटकमध्ये पकडलं आहे त्याच्यासोबत पोलिसांनी मोहसिन नावाच्या तरुणाला देखील ताब्यात घेतलं आहे. लवकरच दोघांनाही मुंबईत आणले जाणार आहे. दरम्यान, यशश्री शिंदेच्या हत्येपूर्वीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून यामध्ये आरोपी दाऊद हा तिचा पाठलाग करताना दिसून येत आहे. यामुळे परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.