Local Video: मुंबई लोकलच्या महिला डब्यात WWE! कुणी झिंज्या उपटल्या तर, कुणी हाताचा चावा घेतला; व्हिडिओ तुफान व्हायरल

Mumbai Local Train Chaos: मुंबई लोकलच्या फर्स्ट क्लास कोचमध्ये विक्रोळी ते घाटकोपर दरम्यान दोन महिला गटांमध्ये हातात हात लागल्यावर जोरदार हाणामारी झाली. पोलिस कारवाई न केल्याचा आरोप आहे.
WOMEN'S VIOLENT FIGHT IN MUMBAI LOCAL TRAIN
WOMEN'S VIOLENT FIGHT IN MUMBAI LOCAL TRAINSaam Tv News
Published On

मुंबईची जीवनवाहिनी म्हणजे रेल्वे लोकल. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व सामान्यांसाठी लोकल हा पर्याय बेस्ट आहे. लाखोच्या संख्येनं लोकलने दररोज प्रवासी ये जा करतात. पण याच लोकलमधील गर्दीमुळे किंवा बसण्याच्या जागेमुळे एकमेकांमध्ये वाद होतो. शाब्दिक वाद कधी कधी टोकाला जातो आणि हाणामारीला सुरूवात होते. या हाणामारीचे व्हिडिओ सोशल मीडियातही व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडिओ मुंबई लोकलच्या महिला डब्यामधील महिलांमधील मारामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

WOMEN'S VIOLENT FIGHT IN MUMBAI LOCAL TRAIN
Pune Crime: भल्यापहाटे कार थांबली, कोयत्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पंढरीच्या वारीला जाताना संतापजनक प्रकार; पुण्यासह महाराष्ट्र हादरला

लोकलमधील महिलांचा मारामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ही लोकल कर्जतहून सीएसएमटीच्या दिशेनं जात होती. याच लोकल ट्रेनमध्ये दोन महिला गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. विक्रोळी ते घाटकोपर दरम्यान, फर्स्ट क्लास कोचमध्येही मारामारी घडली. हाणामारी ही क्षुल्लक कारणावरून घडलीत. एकमेकांच्या हाताला कोपरा लागल्याच्या गैरसमजावरून हा प्रकार घडला.

WOMEN'S VIOLENT FIGHT IN MUMBAI LOCAL TRAIN
BJP MLA: पादरीचा सैराट करेल त्याला लाख रूपये.. भाजप आमदाराच्या वादग्रस्त विधानानंतर ख्रिश्चन समाज आक्रमक; नेमकं प्रकरण काय?

हाणामारी सोडवण्यासाठी जेव्हा काही महिलांनी हस्तक्षेप केला, तेव्हा त्यांच्यावरही चावा आणि मारण्याचा प्रकार घडला. तसेच काही काळ महिलांमध्ये हाणामारी सुरूच होती. या प्रकरणाची माहिती रेल्वे पोलिसांना दिली असता, त्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचं पोलिसांचा आरोप आहे. या हाणामारी दरम्यान, एका महिला प्रवाशाने या प्रकाराचा व्हिडिओ शूट केला. तसेच सोशल मीडियात व्हायरल केला.

कोंबड्यांची शिकार करण्याच्या नादात बाजूच्या शेतातून बिबट्या थेट शेतकऱ्याच्या अंगणापर्यंत धावत आला. ही घटना अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथे घडली. यादरम्यान, शेतकरी राजेंद्र उगले यांच्या घरातील महिला अंगणात कपडे सुकवण्यासाठी टाकत होती. अचानक बिबट्या आपल्याकडे धावत येत असल्याचे बघून महिला घाबरून खाली पडली, तर महिलेला बघून धावणारा बिबट्या जागेवरच थबकला आणि त्याने माघारी धूम ठोकली. काल दुपारची ही सगळी थरारक घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गणोरे आणि डोंगरगाव परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार आणि पशुधनावरील हल्ले वाढले आहेत.. वन विभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com