उन्हाच्या तडाख्यात गारवा! मुंबई-कोकणात वादळी पावसाचा इशारा; वाचा IMD नं काय वर्तवला अंदाज?

IMD Rain Forecast For Mumbai And Konkan April 2026: मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर पुढील काही दिवसांत वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उष्णतेपासून दिलासा मिळणार असून विजांचा कडकडाट, सोसाट्याचे वारे आणि काही ठिकाणी गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Dark clouds gather over Mumbai skyline as IMD issues thunderstorm and rainfall alert across Konkan region.
Dark clouds gather over Mumbai skyline as IMD issues thunderstorm and rainfall alert across Konkan region.saam tv
Published On

मागच्या काही दिवसांपासून उन्हाच्या चटक्यामुळे अंगाची लाहीलाही झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलास मिळण्याची शक्यता आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पाच दिवस पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच पुढील दोन दिवस मुंबईमध्ये पावसाची अधिक शक्यता वर्तवली आहे.

Dark clouds gather over Mumbai skyline as IMD issues thunderstorm and rainfall alert across Konkan region.
Kolhapur : दुर्दैवी! रस्त्याने जाताना अंगावर भिंत कोसळली, प्राध्यापिका अन् शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू

हवामान विभागाच्या अंदाजानुसार सोमवारी (दि.20) मुंबईत मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही पुढील 48 तास आभट वातावरण राहणार आहे. मुंबईच्या तुलनेत दक्षिण कोकणात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

Dark clouds gather over Mumbai skyline as IMD issues thunderstorm and rainfall alert across Konkan region.
Shocking : मटण अर्धवट शिजलं, मित्रांसमोरच नवऱ्यानं वाद घातला; अपमान सहन न झाल्यानं बायकोनं संपवली जीवनयात्रा

पश्चिम महाराष्ट्रासह खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता

राज्यातील विविध भागांमध्ये पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याचे संकेत मिळत असून 20 ते 22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खानदेश, मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांमध्ये दुपारनंतर आभाळ दाटून येत मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. या काळात विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.

Dark clouds gather over Mumbai skyline as IMD issues thunderstorm and rainfall alert across Konkan region.
Gold Rate: अक्षय्य तृतीयेच्या आधी सोन्याला चकाकी, १० तोळा सोनं ११००० रुपयांनी महागलं; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

हवामान खात्याच्या अंदाजानुसार 19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्र, उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यात दुपारनंतर वादळी पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यानंतर 20 आणि 21 एप्रिल रोजी या पावसाचा प्रभाव अधिक भागांमध्ये जाणवण्याची शक्यता असून पुणे विभागासह मराठवाड्यातील दक्षिण भाग, छत्रपती संभाजीनगर विभाग आणि विदर्भातील अमरावती परिसरातही वादळी पावसाची शक्यता आहे. मात्र 22 एप्रिल रोजी या पावसाच्या क्षेत्रात आणि तीव्रतेत काहीशी घट होईल, असे संकेत आहेत.

कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत, शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावीत आणि वादळी वारे व गारपीटीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com