Kolhapur : दुर्दैवी! रस्त्याने जाताना अंगावर भिंत कोसळली, प्राध्यापिका अन् शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू

Ajara Kolhapur wall collapse accident details : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे पाडकाम सुरू असताना भिंत कोसळून प्राध्यापिका आणि शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. एका महिलेला गंभीर दुखापत झाली असून परिसरात शोककळा पसरली आहे.
Kolhapur accident news today
Debris of the collapsed wall in Ajara, Kolhapur, where a professor and a schoolgirl lost their lives during a demolition accident.साम टीव्ही मराठी न्यूज
Published On

रणजित माजगावकर, कोल्हापूर प्रतिनिधी

Kolhapur accident news today : कोल्हापूरमधील आजरा शहरात अंगावर भिंत कोसळल्यामुळे प्राध्यापिका आणि शाळकरी मुलीचा जागीच (professor and schoolgirl killed) मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. सकाळी ११ वाजताच्या आसपास आजऱ्यातील (Maharashtra Ajara) लिंगायत गल्ली परिसरात जेसीबीने एका घराचे पाडकाम (Wall collapse accident) सुरू होते. त्यावेळी रस्त्याने जाणाऱ्या ३ जणांवर भिंत कोसळली. या दुर्घटनेत प्राध्यापिका आणि शाळकरी मुलीचा मृत्यू झाला, तर एक महिला जखमी झाली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर (Kolhapur accident news today) आजारा शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आजऱ्यात अंगावर भिंत (Ajara news updates) कोसळून महाविद्यालयीन प्राध्यापिका ज्योती नितीन कुंभार (वय : ४२ वर्षे) आणि १४ वर्षाची वैष्णवी तुकाराम भोसले यांचा अपघातात मृत्यू झालाय. तर ललिता तुकाराम भोसले (वय : ४५ वर्षे) या गंभीर जखमी झाल्या आहेत. दुर्दैवी घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली. अपघातानंतर तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले.

Kolhapur accident news today
Birth Certificate : फक्त १० रूपयांत कोणत्याही वयात मिळवा जन्म दाखला, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

४५ वर्षाच्या ललिता यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी नगराध्यक्ष अशोक चराटी, डी वाय एसपी,तहसीलदार समीर माने, नायब तहसीलदार विकास कोलते,मंडल अधिकारी सुंदर जाधव,वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमोल पाटील तात्कळ धाव घेतली.

Kolhapur accident news today
HSC SSC Result 2026 : दहावी-बारावीच्या निकालाची संभाव्य तारीख आली समोर, आताच करा नोट

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे ११ वाजता आजरा-महागाव रस्त्यावरील लिंगायत गल्ली परिसरात ही दुर्घटना घडली. जुने घर पाडण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी अचानक भिंत रस्त्यावर कोसळली. त्याचवेळी रस्त्यावरून जात असलेल्या २ महिला व मुलगी भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्या. या घटनेत वैष्णवी (वय ११) आणि ज्योती कुंभार (वय ४२) यांचा जागीच मृत्यू झाला. तर ललिता तुकाराम भोसले (वय ४५) या गंभीर जखमी असून त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनास्थळी नागरिकांनी तातडीने धाव घेत ढिगाऱ्यातून तिघींना बाहेर काढले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गर्दी नियंत्रणात घेतली असून ढिगार्‍याखाली आणखी कोणी अडकले आहे का? यासाठी शोधमोहीम राबवण्यात आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Kolhapur accident news today
राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी संपावर! २१ एप्रिलपासून मोठे आंदोलन, तुमच्यावर काय होणार परिणाम?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com