Maharashtra government employees strike April 21 impact : मंगळवारपासून (21 एप्रिल) राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास तब्बल १७ लाख कर्मचारी रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगण्यात आले. संपामुळे सरकारी कार्यालयांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. तसेच शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि अन्य अत्यावश्यक सेवांवरही मोठा परिणाम होऊ शकतो. क
गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने कर्मचारी संघटनांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. २१ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या संपामुळे राज्यातील सरकारी कार्यालयांचे कामकाज पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. शाळा, रूग्णालयांसह सर्व अत्यावश्यक सेवा ठप्प होऊ शकतात.
महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांनी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपामध्ये सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे. २१ एप्रिल रोजी होणाऱ्या संपामध्ये फक्त मंत्रालयीन कर्मचारीच नव्हे, तर शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांमधील कर्मचारीही सहभागी होणार आहेत. त्यामुळे शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या अत्यावश्यक सेवांवर मोठा परिणाम होऊ शकतो.
चर्चा निष्फळ ठरल्यास आंदोलन तीव्र होणार
कर्मचारी संघटनांनी सरकारला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी अंतिम मुदत दिली आहे. पण जर सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही किंवा होणारी चर्चा निष्फळ ठरली, तर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देवेंद्र फडणवीस यावर काय निर्णय घेणार? याकडे राज्याचे लक्ष लागलेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.