Jalna crime news today
Jalna crime news todaySaam TV Marathi

Crime : मराठवाडा हादरला! घाटी रूग्णलायत गोळ्या झाडून हत्या, ३ जणांचा गोळीबार

Ghati Hospital Jalna news : जालना शहरातील घाटी रुग्णालय परिसरात दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी तरुणावर गोळीबार केला. या घटनेत 28 वर्षीय चरण रायमल्लू याचा मृत्यू झाला असून आरोपी फरार आहेत. पोलिसांचा शोध मोहीम सुरू आहे.
Published on

अक्षय शिंदे पाटील, जालना प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Jalna crime news today : जालना शहरातील नूतन वसाहत भागात असलेल्या घाटी रुग्णालय परिसरात आज रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना समोर आली, दुचाकी वर आलेल्या दोन ते तीन जणांनी गोळीबार केला असून यामध्ये डोक्यात गोळी लागल्याने एका 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला,चरण रायमलू असं या गोळीबार मध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून घटनास्थळी जाऊन पोलिसांनी सदरील घटनेचा पंचनामा करत तपासाला सुरुवात केली,जुन्या वादातून ही गोळीबाराची घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून आरोपी फरार आहे.दरम्यान या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

Jalna crime news today
Mayor election : भाजपच्या हातातोंडाशी आलेलं महापौरपद जाणार? आंबेडकर सरसावले, सर्वपक्षीय एकी?

जालना शहर गोळीबार आणि हादरलं

जालन्यात मध्यवस्तीत गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील नूतन वसाहत परिसरातील घाटी रोडवर ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या 2 ते 3 जणांनी एका युवकावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात चरण रायमल्लू या युवकाचा मृत्यू झाला आहे.दुचाकीवर आलेल्या 2 ते 3 आरोपींनी त्याच्यावर 2 ते 3 गोळ्या झाडल्या.

Jalna crime news today
Mayor Reservation : तुमचा महापौर कोण? मुंबई, पुण्यासह २९ महापालिकांसाठी आरक्षण सोडत जाहीर, सर्व यादी एका क्लिकवर

आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना

जालना शहरातील गर्दीच्या ठिकाणी झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. मध्यवस्तीत घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नसून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Jalna crime news today
Pimpri Chinchwad Mayor : पिंपरी-चिंचवडची पहिली कारभारीण कोण? महापौरपादासाठी या नावांमध्ये स्पर्धा, कुणाच्या गळ्यात पडणार माळ?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com