Pimpri Chinchwad mayor
Pimpri Chinchwad mayor Saam TV Marathi

Pimpri Chinchwad Mayor : पिंपरी-चिंचवडची पहिली कारभारीण कोण? महापौरपादासाठी या नावांमध्ये स्पर्धा, कुणाच्या गळ्यात पडणार माळ?

Pimpri Chinchwad mayor post reserved for general women category : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने इतिहास घडणार आहे. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने शहराची पहिली महिला महापौर भाजपचीच असणार आहे.
Published on

गोपाळ मोटघरे, पिंपरी चिंचवड

Who will become the first woman mayor of Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले असून, आगामी अडीच वर्षांसाठी हे पद 'सर्वसाधारण महिला' गटासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. महापालिकेतील पक्षीय बलाबल पाहता, भारतीय जनता पक्षाचे स्पष्ट बहुमत असल्याने शहराचा पुढील महापौर भाजपचाच असेल, हे आता निश्चित झाले आहे. यामुळे भाजपमधील इच्छुकांच्या हालचालींना वेग आला असून शहराच्या पहिल्या महिला महापौराचा मान कोणाला मिळणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (Pimpri Chinchwad Mayor reservation news)

पिंपरी-चिंचवडच्या १२८ सदस्यांच्या सभागृहात महिलांचे संख्याबळ लक्षणीय आहे. विशेष म्हणजे एकूण सदस्यांपैकी निम्म्या म्हणजेच ६४ महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत. भाजप सुशिक्षित आणि अनुभवी चेहऱ्याचा शोध घेत आहे. भाजपकडे ४२ महिला नगरसेविकांचे संख्याबळ असल्याने महापौर निवडीत पक्षाची भूमिका निर्णायक आहे. पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व सुशिक्षित चेहरा, प्रशासकीय जाण आणि संघटन कौशल्य या तीन मुख्य निकषांवर उमेदवाराची निवड करण्याची शक्यता आहे.

Pimpri Chinchwad mayor
Mayor Reservation : तुमचा महापौर कोण? मुंबई, पुण्यासह २९ महापालिकांसाठी आरक्षण सोडत जाहीर, सर्व यादी एका क्लिकवर

भाजपमधील प्रमुख दावेदार महिलांची नावे चर्चेत आहेत, यात सारिका गायकवाड यांचा प्रभाग ३ मधून सर्वाधिक १६,०११ मताधिक्याने विजयी झाल्यामुळे त्यांचा दावा प्रबळ मानला जात आहे. अनुराधा गोरखे, रेश्मा भुजबळ, स्नेहा कलाटे आणि श्रुती डोळस: यांसारख्या १०,००० पेक्षा जास्त मताधिक्य घेणाऱ्या महिला उमेदवारांच्या नावाचीही चर्चा आहे. तसेच हिराबाई घुले, कविता भोंगळे (कडू), राजश्री लांडगे, सोनाली गव्हाणे, नम्रता लोंढे, सुप्रिया चांदगुडे, योगिता नागरगोजे, शीतल वर्णीकर, शैलजा मोरे, शर्मिला बाबर, अपर्णा डोके, नीता पाडाळे, मनीषा पवार, आरती चौंधे आणि कुंदा भिसे या ज्येष्ठ व अनुभवी महिला नगरसेविकांच्या नावांचीही पक्षात चर्चा रंगली आहे.

Pimpri Chinchwad mayor
Pune Mayor : पुण्यात 'महिलाराज'! कोण होणार महापौर? भाजपकडून ५ लाडक्या बहिणींची नावं आघाडीवर

भाजपला शहराचा विकास आणि आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एका सक्षम महिला नेतृत्वाची निवड करायची आहे. यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्थानिक नेते लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कोणाची वर्णी लागते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Pimpri Chinchwad mayor
Pune Mayor : पुण्यात 'महिलाराज'! कोण होणार महापौर? भाजपकडून ५ लाडक्या बहिणींची नावं आघाडीवर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com