Pune Mayor : पुण्यात 'महिलाराज'! कोण होणार महापौर? भाजपकडून ५ लाडक्या बहिणींची नावं आघाडीवर

Pune Mayor reservation news : पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी खुला महिला प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाले आहे. भाजपकडून रंजना टिळेकर, मंजुषा नागपुरे, मानसी देशपांडे, रोहिणी चिमटे यांच्यासह पाच महिला नगरसेविकांची नावे चर्चेत आहेत.
Pune Mayor reservation news
Pune Mayor reservation newsSaam
Published On

Pune mayor post reserved for open women category 2026 : पुणे महानगर पालिकेसाठी महापौरपद खुला महिला प्रवर्गासाठी राखीव निघाला आहे. पुण्यात भाजपची एकहाती सत्ता आली आहे. त्यामुळे पुण्याचं महापौरपद कुणाकडे येणार? याची चर्चा सुरू झाली आहे. आता पुणे महानगरपालिकेतील महापौरपद महिलांसाठी राखीव असल्यामुळे गणिते बदलली आहेत. पुण्यातील भाजप कुणाला संधी देणार? कोणत्या लाडक्या बहि‍णींची महापौरपदावर वर्णी लागणार, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, पुण्यात भाजपपुढे मोठं आव्हान तयार झालेय. आरक्षण सोडत खुल्या प्रवर्गाच्या निघाल्यामुळे भाजपच्या ११९ नगरसेवकांपैकी कोणाला महापौरपद मिळणार याकडे लक्ष लागलेय. (Maharashtra mayor reservation list)

Pune Mayor reservation news
Mayor Reservation : तुमचा महापौर कोण? मुंबई, पुण्यासह २९ महापालिकांसाठी आरक्षण सोडत जाहीर, सर्व यादी एका क्लिकवर

भाजपकडून ५ लाडक्या बहि‍णींची नावे चर्चेत -

पुणे महानगर पालिकेसाठी महापौरपदासाठी भाजपकडून ५ महिला नगरसेवकांची नावे आघाडीवर आहेत. त्यामध्ये रंजना टिळेकर, मंजुषा नागपुरे, मानसी देशपांडे, रोहिणी चिमटे यांच्या नावाचा समावेश आहे. मानसी देशपांडे यांनी यंदा विजयाची हॅट्रिक केलेली आहे. त्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या नातेवाईक आहेत. त्यामुळे त्यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जातेय.

Pune Mayor reservation news
KDMC Mayor Reservation : कल्याण डोंबिवलीचा महापौर कोण होणार? आरक्षण जाहीर, वाचा

मंजुषा नागपुरे यांनी यंदाच्या महापालिकेत बिनविरोध विजय मिळवला होता. रंजना टिळेकर या आमदार योगेश टिळेकर यांच्या आई आहेत त्यांची ही सहावी टर्म आहे. त्यामुळे त्यांचेही नाव महापौरपदासाठी जोरदार चर्चेत आहे. पक्षाने संधी दिल्यास त्याचं सोनं करू आम्ही पाच टर्म नगरसेवक असताना प्रभागात काम केलेलं आहे. त्यामुळे पुण्यासारख्या शहरात काम करण्याची संधी मिळाली तर शहरात मोठ्या प्रमाणात विकास करू, अशी प्रतिक्रिया रंजना टिळेकरांच्या मुलाने दिली आहे.

Pune Mayor reservation news
ZP Election : बापाचे झेडपीचं तिकिट कापलं, मुलाचा किळसवाणा प्रकार, अजित पवारांच्या आमदाराच्या कार्यालयाबाहेर लघवी

८ ठिकाणी होणार खुल्या प्रवर्गातील महापौर

छत्रपती संभाजी नगर, परभणी, सांगली मिरज कुपवाड, अमरावती, वसई विरार, सोलापूर, पिंपरी चिंचवड, भिवंडी निजामपूर

सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर

- बृहन्मुंबई

- पुणे

- धुळे

- नवी मुंबई

- नाशिक

- नागपूर

- नांदेड

- मीरा भाईंदर

खालील 4 महापालिकांमध्ये ओबीसी महिला महापौर होणार -

- जळगांव

- चंद्रपूर

- अहिल्यानगर

- अकोला

कल्याण डोंबिवली मध्ये एसटी प्रवर्गाचा महापौर बसणार

Pune Mayor reservation news
Mumbai Horror: मुंबईत विक्रृतीचा कळस, अडीच महिन्याच्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com