

Latur Zilha Parishad Election : जिल्हा परिषद निवडणुकीत वडिलांचे तिकिट नाकारल्यामुळे मुलाला राग आणावर आला. संतापाच्या भरात मुलाने राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री संजय बनसोडे यांच्या कार्यालयाबाहेर लघवी केली. त्या तरूणाचा किळसवाणा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेमुळे लातूरमध्ये एकच खळबळ उडाली. बनसोडे यांच्या कार्यालयाबाहेर लघवी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. (Viral video of shocking protest in Udgir Latur)
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट (NCP) पक्षाकडून वडिलांना उमेदवारीचे तिकीट न मिळाल्याच्या रागातून एका तरुणाने संतापजनक कृत्य केल्याची घटना लातूरच्या उदगीर येथे घडली आहे. संबंधित तरुणाने थेट उदगीर विधानसभेचे आमदार आमदार संजय बनसोडे यांच्या कार्यालयाबाहेर जाऊन लघवी करत निषेध नोंदवला. या घटनेमुळे शहरात एकच चर्चा सुरू झाली आहे.
तर मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद उमेदवारी वाटपात वडिलांचे नाव डावलण्यात आल्याने संबंधित तरुण नाराज होता. तर अन्य उमेदवाराला संधी दिल्यामुळे हा तरुण संतप्त झाला आणि त्याने निषेधाची ही अशोभनीय पद्धत केली.ही घटना आमदार संजय बनसोडे यांच्या उदगीर येथील कार्यालयाबाहेर घडली आहे. घटनेची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी तरुणाला तेथून हटवले.
दरम्यान, या प्रकारावर राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. निषेध व्यक्त करण्याचे लोकशाही मार्ग असताना अशा प्रकारचे कृत्य निषेधार्ह असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. तसं संबंधित तरुण हा मद्यपान करून असल्याचे देखील माहिती सांगण्यात येत आहे दरम्यान या हा सगळा घटनाक्रमाचा व्हिडिओ सध्या सोशल्यमावर व्हायरल होतो आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.