ZP Election : झेडपीच्या मतदानाआधीच भाजपने खातं उघडलं, उमेदवाराचा बिनविरोध विजय

Panchayat Samiti election results : मतदानाआधीच वैभववाडी पंचायत समितीत भाजपने विजयाचे खाते उघडले आहे. कोकिसरे मतदारसंघातून साधना सुधीर नकाशे यांची बिनविरोध निवड झाली.
ZP Election : झेडपीच्या मतदानाआधीच भाजपने खातं उघडलं, उमेदवाराचा बिनविरोध विजय
ZP Election : झेडपीच्या मतदानाआधीच भाजपने खातं उघडलं, उमेदवाराचा बिनविरोध विजयSaam TV Marathi
Published On

विनायक वंजारे, साम टीव्हा प्रतिनिधी

BJP candidate elected unopposed in Vaibhavwadi Panchayat Samiti : नगरपरिषदा, महापालिका निवडणुकीतील बिनविरोधचा ट्रेंड आता जिल्हा परिषद अन् पंचायत समितीच्या निवडणुकीतही कायम राहिलाय. मतदानाआधीच पंचायत समितीमध्ये भाजपने विजयाचे खाते उघडलेय. सिंधुदुर्गातील वैभाववाडीमध्ये भाजपच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे कोकीसरे मतदारसंघातून भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांच्या पत्नी साधना सुधीर नकाशे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे भाजपने वैभववाडी पंचायत समितीत आपले खाते उघडले. हा विजय केलेल्या विकास कामांचा विजय असल्याची भावना यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांनी व्यक्त केली आहे. (Sindhudurg Zilla Parishad elections)

वैभववाडी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने मोठी मुसंडी मारली आहे. कोकिसरे पंचायत समिती मतदारसंघातून केवळ भाजपचाच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने भाजपच्या अधिकृत उमेदवार साधना सुधीर नकाशे यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर जिल्ह्यात भाजपची ही पहिलीच बिनविरोध एन्ट्री ठरल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे.

ZP Election : झेडपीच्या मतदानाआधीच भाजपने खातं उघडलं, उमेदवाराचा बिनविरोध विजय
आयआयटीमध्ये पीएचडी विद्यार्थ्याची आत्महत्या, सहाव्या मजल्यावरून उडी मारली, कॅम्पसमध्ये शोककळा

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वैभववाडीत बुधवारी मोठी गर्दी झाली होती. कोकिसरे मतदारसंघातून भाजपतर्फे साधना सुधीर नकाशे यांनी दोन अर्ज भरले होते, तर अक्षता सूर्यकांत डाफळे यांनी भाजपचा डमी अर्ज सादर केला होता. विशेष म्हणजे, या मतदारसंघातून ठाकरे सेना मनसे किंवा काँग्रेस यापैकी कोणत्याही पक्षाने आपला उमेदवार रिंगणात उतरवला नाही. इतर कोणत्याही पक्षाचा किंवा अपक्षाचा अर्ज न आल्याने नकाशे यांची बिनविरोध निवड आता निश्चित झाली आहे.

ZP Election : झेडपीच्या मतदानाआधीच भाजपने खातं उघडलं, उमेदवाराचा बिनविरोध विजय
Shiv Sena : पुन्हा तारीख पे तारीख; शिवसेना कुणाची? आता या दिवशी होणार सुनावणी

या विजयाची बातमी समजताच वैभववाडीतील भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. भाजप कार्यालयासमोर फटाक्यांची आतिशबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी भाजपचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नकाशे यांच्या रूपाने भाजपने निवडणुकीच्या रिंगणात विजयाचे खाते उघडल्याने संपूर्ण तालुक्यात सध्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ZP Election : झेडपीच्या मतदानाआधीच भाजपने खातं उघडलं, उमेदवाराचा बिनविरोध विजय
Nagpur : प्रेमातील नकार पचवता आला नाही, तरूणीची घरात घुसून हत्या, गळा दाबला अन् डोके भींतीवर आदळले

सिंधुदुर्गात एकूण ७१३ अर्ज प्राप्त

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अधिकृत आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील ८ तालुक्यांमधून जिल्हा परिषदेसाठी २७३, तर पंचायत समितीसाठी ४४० असे एकूण ७१३ नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील एकूण ५० जिल्हा परिषद गट आणि १०० पंचायत समिती गणांसाठी ही निवडणूक होत आहे. सावंतवाडी तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी सर्वाधिक ६० आणि पंचायत समितीसाठी १०१ अर्ज आले असून येथे मोठी राजकीय चुरस पाहायला मिळत आहे. तर वैभववाडी आणि दोडामार्ग तालुक्यात जागांच्या संख्येनुसार अर्जांचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी, सर्वच जागांसाठी उमेदवारांनी उत्साह दाखवला आहे. पुढील टप्प्यात अर्जांची छाननी आणि माघारीची प्रक्रिया पार पडणार आहे.

ZP Election : झेडपीच्या मतदानाआधीच भाजपने खातं उघडलं, उमेदवाराचा बिनविरोध विजय
देवदर्शनाहून येताना काळाचा घाला, बस-टँकरची धडक, ४ जणांचा मृत्यू, २४ जण जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com