Nagpur : प्रेमातील नकार पचवता आला नाही, तरूणीची घरात घुसून हत्या, गळा दाबला अन् डोके भींतीवर आदळले

Nagpur woman murdered after rejecting one sided love : नागपूरच्या गोधनी परिसरात एकतर्फी प्रेमातून तरुणीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येचा बनाव पोस्टमार्टम अहवालामुळे उघडकीस आला.
Nagpur crime news today
Nagpur crime news todaySaam
Published On

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी

Nagpur crime news today : एकतर्फी प्रेमातून नागपूरमध्ये तरूणीची घरात घुसून निर्घृण हत्या केली. तरूणाने मुलीच्या घरात घुसून तिची गळा दाबून अन् भिंतीवर आदळून हत्या केली. त्यानंतर आत्महत्येचा बनाव रचला, पण पोस्टमार्टम रिपोर्टमधून बिंग फुटले. पोलिसांनी तात्काळ तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या. नागपूरमधील गोधनीत ही भयानक घटना घडली.

नागपूरमधील गोधनीत भरदिवसा तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. एकतर्फी प्रेमातून शेजारच्या युवकाने घरात घुसून मुलीचा खून केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली. प्राची हेमराज खापेकर (२३) असं मृतक तरुणीचे नाव आहे. प्राची सध्या बी.ए.ची विद्यार्थिनी होती. त्याशिवाय ती शेअर ट्रेडिंगचे प्रशिक्षण घेत होती. शेजारी राहणाऱ्या ३८ वर्षाच्या शेखरचा तिच्यावर जीव जडला होता. पण तिने त्याला नकार दिला होता. शेखरला हा नकार पचवता आला नाही. त्यातूनच त्याने प्राचीचा खून केला.

Nagpur crime news today
Third Mumbai : तिसऱ्या मुंबईत ग्रोथ सेंटर उभाणार, एक लाख कोटींची गुंतवणूक येणार, राज्य सरकारचा नेमका प्लान काय?

आरोपी शेखर अजाबराव ढोरे (३८) याला पोलिसांनी अटक केली. शेखर हा प्राचीच्या घराच्या जवळच राहत होता. एकतर्फी प्रेमाचा नकार पचवू न शकल्याने शेखर याने प्राचीची दिवसाढवळ्या हत्या केली. शेखर याने हत्येनंतर आत्महत्येचा बनाव रचला. शेखर याने प्राचीचा आधी गळा दाबला, त्यानंतर भीतींवर जोरात डोके आदळले. मृत प्राचीला ओढणी गळफास देत आत्महत्येचा बनाव रचला.

Nagpur crime news today
Gold Rate : सोन्याच्या किंमतीत रेकॉर्डब्रेक वाढ, तब्बल ₹७५०० नी महागले, तर चांदीचा 'दस का दम'

पण पोस्टमार्टम रिपोर्टमधून शेखर याचा भंडाफोड झाला. डोक्याला गंभीर मार शरीरावर जखमांचा खुणा असल्यानं पोलिसांनी हत्येचा गुन्हा केला दाखल. कुटुंब बाहेर गेले असतांना शेखर हा घरात घुसला होता. आई-वडील आणि भाऊ कामावर गेले होते, तर घरात प्राची एकटी होती. त्याने डाव साधला अन् प्राचीचा जीव घेतला. या घटनेनंतर नागपूर हादरलेय.

Nagpur crime news today
कामाची बातमी! मुंबईहून पुणे अन् कोल्हापूरसाठी विशेष रेल्वे, वाचा वेळापत्रक अन् थांबे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com