LTT to Nanded special train stops and timings : प्रवाशांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी मध्य रेल्वेने मुंबईहून कोल्हापूर / अमरावती / नांदेड या दरम्यान विशेष रेल्वे सेवा (Indian Railway ) सुरू केली आहे. या मार्गावर ८ विशेष रेल्वे सेवा चालवण्यात येणार अशल्याचे समजतेय. मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि नांदेड दरम्यान विशेष रेल्वे सेवा तसेच पनवेल– अमरावती दरम्यान अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या चालविणार आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊयात...
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–कोल्हापूर–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष – २ सेवा
गाडी क्रमांक 01039 विशेष ही गाडी दिनांक २४.०१.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.३० वाजता सुटेल आणि कोल्हापूर येथे त्याच दिवशी ११.४५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01040 विशेष ही गाडी दिनांक २६.०१.२०२६ रोजी कोल्हापूर येथून १६.४० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०४.०५ वाजता पोहोचेल.
कुठे थांबणार ? दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, चिंचवड, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज, जयसिंगपूर आणि हातकणंगले.
लोकमान्य टिळक टर्मिनस– नांदेड– लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष – ४ सेवा
गाडी क्रमांक 01041 विशेष ही गाडी दिनांक २३.०१.२०२६ आणि २४.०१.२०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १५.३० वाजता सुटेल आणि नांदेड येथे दुसऱ्या दिवशी ०४.०० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01042 विशेष ही गाडी दिनांक २४.०१.२०२६ आणि २५.०१.२०२६ रोजी नांदेड येथून २३.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १३.४० वाजता पोहोचेल.
कुठे थांबणार ? ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नगरसोल, छत्रपती संभाजीनगर, जालना, परतूर, सेलू, परभणी आणि पूर्णा.
अमरावती– पनवेल– अमरावती अनारक्षित विशेष – २ सेवा
गाडी क्रमांक 01415 विशेष ही गाडी दिनांक २६.०१.२०२६ रोजी पनवेल येथून १९.५० वाजता सुटेल आणि अमरावती येथे दुसऱ्या दिवशी १२.०० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01416 विशेष ही गाडी दिनांक २२.०१.२०२६ रोजी अमरावती येथून १२.०० वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी ०४.०० वाजता पोहोचेल.
कुठे थांबणार ? कर्जत, लोणावळा, पुणे, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर आणि बडनेरा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.