Pune Accident : दीड वर्षापूर्वी लग्न, आता अपघातात मृत्यू, पुण्यात एसटी बसने उड्डाणपूलावर राजाला उडवले

Newly married man dies in Pune road accident : पुण्यातील रामटेकडी किर्लोस्कर उड्डाणपुलावर रस्ता ओलांडताना कर्नाटक एसटी बसने दिलेल्या धडकेत २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
Pune accident
Pune accident Saam TV Marathi
Published On

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

Pune night accident while crossing road : पुण्यात रामटेकडी किर्लोस्कर रेल्वे उड्डाणपूलावरून रस्ता ओलांडताना एका तरुणाला कर्नाटक एसटी बसने जोरात धडक दिली. या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी अंधार असल्याने नागरिकांना धाव घेऊन गाडीच्या खालून तरुणाला बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात आले. वानवडी पोलिसांनी धाव घेऊन कर्नाटक एसटी चालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावरती सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत राजा लाकडे यांचे दीड वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. (Maharashtra road accident updates)

Pune accident
KDMC Mayor : ठाकरेंचे २ नगरसेवक मनसेत तर २ गायब, कल्याणचं चक्रावणारे राजकारण

डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात एसटी चालकाला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला. राजा यल्लापा लाकडे ( वय २५ रा.वैदुवाडी, हडपसर ) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. आमल्या आयप्पा क्रियाळ ( वय ५८ रा.शहापूर बसवेश्वर नगर, कर्नाटक ) या कर्नाटक एसटी चालकाला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे.

Pune accident
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर दिल्लीत ठरणार, शेलार-साटम अन् शेवाळे राजधानीत, शिंदेंच्या मनात नेमकं काय?

सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास, कर्नाटक एसटी महामंडळाची बस ही सोलापूरच्या दिशेने जात होते, यावेळी रामटेकडी किर्लोस्कर उड्डाणपुलावरून राज लाकडे हा रस्ता ओलांडत होता.रात्रीचे वेळ असल्याने उड्डाण पुलावरून वाहने सुसाट असल्याने रस्ता ओलांडणारा तरुणाला एसटी चालकाने धडक दिली, यामध्ये एसटी बसचे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मत्यू झाला. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन गंभीर जखमी असलेल्या राजला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा पूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Pune accident
Shiv Sena : ठाकरे की शिंदे, शिवसेना कुणाची? आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com