

IIT Kanpur Student Suicide: आयआयटी ( इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) कानपूरमध्ये एक दुःखद आणि हादरवणारी घटना घडली आहे. पीएचडी करणारा २५ वर्षांचा विद्यार्थ्याने कॅम्पसमधील एका इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. रामस्वरूप ईशराम असे त्या मुलाचे नाव आहे. या घटनेनंतर कानपूर कॅम्ससमध्ये शोककळा पसरली. एंजायटी आणि डिप्रेशनच्या आजाराने रामस्वरूप त्रस्त होता, त्यामुळेच त्याने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. (PhD scholar jumps from sixth floor IIT campus)
रामस्वरूप याने मंगळवारी दुपारी दीड वाजता कॅम्पसमधील न्यू एसबीआरए इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रामस्वरूप राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील रहिवासी होता. तो अर्थ सायन्सेस विभागात पीएचडी करत होता. रामस्वरूप जुलै २०२३ पासून कानपूर आयआयटीत होता. त्याची पत्नी मनजू आणि तीन वर्षांची मुलगी यांच्यासोबत तो कॅम्पसमध्येच राहत होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, रामस्वरूप मागील काही दिवसांपासून एंजायटी आणि डिप्रेशनच्या आजाराने त्रस्त होता. त्याची काउंसलिंगही सुरू होती. रामस्वरूप याच्याकडून कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला अन् पोस्टमॉर्टेमाठी पाठवण्यात आला आहे. आयआयटी कानपूरमध्ये मागील तीन आठवड्यात दुसरी आत्महत्याची घटना घडली आहे. यापूर्वी २९ डिसेंबरला बीटेकचा एक विद्यार्थ्याने अशीच आत्महत्या केली होती.
या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस उपायुक्त एसएम कासिम आबिदी यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला याबाबत प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, हा विद्यार्थी बऱ्याच काळापासून नैराश्य आणि चिंताग्रस्त होता, असे प्राथमिक तपासात असे दिसून आले. त्याचे अनेक वेळा काउंसलिंगही झाले होते. तपासाचा भाग म्हणून पत्नीची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, मृताच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार, आजारपणामुळे रामस्वरूप तणावाखाली होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.