Mumbai Horror: मुंबईत विक्रृतीचा कळस, अडीच महिन्याच्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार

Animal cruelty cases in India : मुंबईतील मालाड परिसरात अडीच महिन्यांच्या श्वानाच्या पिल्लावर लैंगिक अत्याचार आणि मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीएएल फाउंडेशनच्या सतर्कतेमुळे आरोपीला अटक करण्यात आली.
Puppy sexual assault case in Mumbai Malad
Puppy sexual assault case in Mumbai MaladSaam TV Marathi
Published On

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Puppy sexual assault case in Mumbai Malad : आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत माणुसकीला काळीमा फासणारी, अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. मालाड पूर्वेतील कुरार गावात एका २० वर्षीय नराधमाने अडीच महिन्यांच्या निष्पाप श्वानाच्या पिल्लावर लैंगिक अत्याचार करत त्याला निर्घृणपणे मारहाण केल्याचा अमानवी प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने केवळ प्राणीप्रेमीच नव्हे, तर संपूर्ण समाज हादरून गेला आहे. (Viral video exposes puppy abuse in Kurar village)

हा भयानक प्रकार ‘प्युअर ॲनिमल लव्हर्स फाउंडेशन’ (PAL Foundation) या प्राणी कल्याण संस्थेच्या सतर्कतेमुळे उघड झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर स्थानिक प्राणी कार्यकर्ते आणि मुंबई पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. कुरार गावातील एका सार्वजनिक शौचालयात आरोपी आतून दरवाजा बंद करून लपून बसला होता. दरवाजा उघडण्यास त्याने ठाम नकार दिला. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून दरवाजा उघडला असता आरोपी अर्धनग्न अवस्थेत आढळून आला. त्याला तत्काळ ताब्यात घेण्यात आले.

Puppy sexual assault case in Mumbai Malad
Nagpur : प्रेमातील नकार पचवता आला नाही, तरूणीची घरात घुसून हत्या, गळा दाबला अन् डोके भींतीवर आदळले

या अमानुष कृत्यामुळे श्वानाचे पिल्लू गंभीर जखमी झाले असून त्याची अवस्था अत्यंत नाजूक आहे. पीएएल फाउंडेशनच्या माहितीनुसार, पिल्लाला तातडीने वाचवून पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू असून त्याचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली जात आहे.

Puppy sexual assault case in Mumbai Malad
देवदर्शनाहून येताना काळाचा घाला, बस-टँकरची धडक, ४ जणांचा मृत्यू, २४ जण जखमी

“मुक्या, निष्पाप प्राण्यावर अशी घृणास्पद आणि विकृत कृत्ये करणाऱ्यांना कोणतीही माफी देता येणार नाही. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” अशी ठाम भूमिका पीएएल फाउंडेशनने घेतली आहे. दरम्यान, पोलिसांनी संबंधित २० वर्षीय आरोपीला अटक केली असून त्याच्यावर भारतीय न्याय संहिता तसेच ‘प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आरोपीवर कठोर कारवाई करण्याची आणि अशा विकृत प्रवृत्तींचे कायमचे उच्चाटन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ही घटना केवळ एका प्राण्यावर झालेला अत्याचार नसून, समाजाच्या नैतिक अधःपतनाचे भयावह चित्र असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Puppy sexual assault case in Mumbai Malad
Gold Rate : सोन्याच्या किंमतीत रेकॉर्डब्रेक वाढ, तब्बल ₹७५०० नी महागले, तर चांदीचा 'दस का दम'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com