Solapur Mayor Reservation : देशमुख, काळे की जाधव, सोलापूरचा महापौर कोण? भाजप धक्कातंत्र वापरणार, पाहा कुणाच्या नावाची चर्चा

Solapur mayor post reserved for general category BJP : सोलापूर महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने भाजपमध्ये मोठी हालचाल सुरू झाली आहे.
Solapur Mayor Reservation
Solapur Mayor ReservationSaam TV Marathi
Published On

विश्वभूषण लिमये, सोलापूर प्रतिनिधी

Who will become the next mayor of Solapur BJP : सोलापूर महापालिकेचं महापौरपद हे सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झालं आहे. त्यामुळे आता सोलापूरमध्ये भाजपचा कोण महापौर होणार? याची उत्सुकता भाजप कार्यकर्त्यांना लागली आहे. सोलापूरमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवली. आता महापौरपद कुणाला दिले जाणार? याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भाजपकडून सोलापूरसाठी काही नावे चर्चेत आहेत. आरक्षणाची सोडत निघताच या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली. (Solapur municipal corporation mayor election update)

सोलापूरमध्ये भाजपकडे ४९ नगरसेवक हे सर्वसाधारण गटातून विजयी झाले आहेत. ज्यामध्ये २४ पुरुष आणि २५ महिला विजयी झाल्या आहेत. भाजपकडून महापौरपदासाठी अनेक दावेदार असून त्यामध्ये प्रामुख्याने प्रभाग 12 मधून विजयी झालेले विनायक कोंड्याल, प्रभाग 10 मधून विजयी झालेले प्रथमेश कोठे, प्रभाग 2 मधून जिंकलेले डॉ.किरण देशमुख, प्रभाग 4 मधून अनंत जाधव तर प्रभाग 24 मधून नरेंद्र काळे हे प्रमुख दावेदार आहेत.

Solapur Mayor Reservation
Mayor Reservation : तुमचा महापौर कोण? मुंबई, पुण्यासह २९ महापालिकांसाठी आरक्षण सोडत जाहीर, सर्व यादी एका क्लिकवर

विनायक कोंड्याल हे महापालिकेत सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले आहेत. विनायक कोंड्याल हे चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेत. शिवाय आमदार देवेंद्र कोठे यांचे भावोजी आहेत. तर प्रथमेश कोठे हे आमदार देवेंद्र कोठे यांचे बंधू आहेत, ते दुसऱ्यांदा नगरसेवक झालेत. डॉ.किरण देशमुख हे आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र असून दुसऱ्यांदा नगरसेवक झाले आहेत. तर अनंत जाधव हे भाजपचे निष्ठावंत असून ते दुसऱ्यांदा नगरसेवक आहेत. त्या सोबतच नरेंद्र काळे हे विद्यार्थी दशेपासून भाजपशी जोडले गेले असून मागील दोन वेळेस ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे भाजप या प्रमुख दावेदारांना संधी देणार की ऐनवेळी धक्कातंत्र वापरून नव्याने एखादा नाव पुढे आणणार हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल.

Solapur Mayor Reservation
Pune Mayor : पुण्यात 'महिलाराज'! कोण होणार महापौर? भाजपकडून ५ लाडक्या बहिणींची नावं आघाडीवर

कल्याण-डोंबिवलीत ST प्रवर्गाचा महापौर

जालना महापालिका SC-महिला महापौर बसणार

लातूर महापालिका SC-महिला महापौर बसणार

ठाणे महापालिका SC-महिला महापौर बसणार

अकोला महापालिकेत OBC- महिला महापौर

अहिल्यानगर पालिकेत OBC-महिला महापौर

चंद्रपूर महापालिकेत OBC-महिला महापौर

जळगाव महापालिकेत OBC-महिला महापौर

इंचलकरंजी महापालिकेत OBC प्रवर्गाचा महापौर

पनवेल महापालिकेत OBC प्रवर्गाचा महापौर

उल्हासनगर महापालिकेत OBC प्रवर्गाचा महापौर

कोल्हापूर महापालिकेत OBC प्रवर्गाचा महापौर

मुंबई महापालिका OPEN-महिलांसाठी राखीव

पुणे महापालिका OPEN-महिलांसाठी राखीव

भिंवडी महापालिका OPEN-महिलांसाठी राखीव

धुळे महापालिका OPEN-महिलांसाठी राखीव

नाशिक महापालिका OPEN-महिलांसाठी राखीव

नवी मुंबई महापालिका OPEN-महिलांसाठी राखीव

नागपूर महापालिका OPEN-महिलांसाठी राखीव

मीरा भाईंदर महापालिका OPEN- महिला

नांदेड महापालिका OPEN-महिलांसाठी राखीव

मालेगाव महापालिका OPEN-महिलांसाठी राखीव

छ.संभाजीनगर महापालिका OPEN प्रवर्ग

वसई विरार महापालिका OPEN प्रवर्ग

परभणी महापालिका OPEN प्रवर्ग

सोलापूर महापालिका OPEN प्रवर्ग

सांगली महापालिका OPEN प्रवर्ग

पिंपरी-चिंचवड महापालिका OPEN प्रवर्ग

अमरावती महापालिका OPEN प्रवर्ग

Solapur Mayor Reservation
KDMC Mayor Reservation : कल्याण डोंबिवलीचा महापौर कोण होणार? आरक्षण जाहीर, वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com