लग्नाचा हट्ट धरला, वाद टोकाला गेला; सनकी बॉयफ्रेंडनं अल्पवयीन गर्लफ्रेंडला निर्घृणपणे संपवलं, मुंबई हादरली

17 Year Old Girl Killed By Boyfriend In Mumbai Kandivali: मुंबईतील कांदिवली परिसरात १७ वर्षीय तरुणीची प्रियकराने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघड. लग्नाच्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती; पोलिसांनी आरोपीला अटक केली.
Police investigating the crime scene in Kandivali East where a 17-year-old girl was allegedly murdered by her boyfriend.
Police investigating the crime scene in Kandivali East where a 17-year-old girl was allegedly murdered by her boyfriend.Saam tv
Published On

कांदिवली पूर्व येथील समतानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दामूनगर परिसरात १७ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासांत तपासाची चक्रे फिरवत प्रियकराला अटक केली आहे. प्रेमसंबंध आणि लग्नाच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

Police investigating the crime scene in Kandivali East where a 17-year-old girl was allegedly murdered by her boyfriend.
Mumbai Prostitution Racket: मराठी अभिनेत्रीचा एका रात्रीसाठी २ लाखात सौदा; मुंबईतील हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

शुक्रवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास दामूनगरमधील डोंगर परिसरात एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळल्याची माहिती समतानगर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस, गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून फॉरेन्सिक पद्धतीने तपास सुरू करण्यात आला.

Police investigating the crime scene in Kandivali East where a 17-year-old girl was allegedly murdered by her boyfriend.
रविवारी लोकलचा मेगा ब्लॉक! मध्य आणि हार्बर मार्गावर होणार परिणाम; घराबाहेर पडताना वेळापत्रक पाहाच

तपासादरम्यान मृत तरुणीची ओळख पटली असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स, लोकेशन आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयित सूरज वाघमारे (वय २२, रा. कांदिवली पूर्व) याला ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली.

Police investigating the crime scene in Kandivali East where a 17-year-old girl was allegedly murdered by her boyfriend.
केडीएमसीतील शिंदेसेनेच्या नगरसेवकाची गुंडगिरी, नगरसेवक रमेश म्हात्रेंची महिला डॉक्टर्सना मारहाण

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार,अल्पवयीन मुलगी ही सूरजकडे लग्न करण्याचा आग्रह धरत होती. या वादातून आरोपीने तिच्या गळ्यावर चाकूने वार केला, ज्यात तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा पुढील तपास समतानगर पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com