Mandwa Gateway Of India Ferry : आता अलिबाग फक्त 'इतक्या' मिनिटांत! गेटवेपासून बोट सेवा पुन्हा सुरु; पाहा नवी वेळ आणि तिकीट

Mandwa Gateway Of India Ferry Boat Update : मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान तीन महिन्यांपासून बंद असलेली जलवाहतूक आजपासून पुन्हा सुरू झाली आहे. प्रवाशांसह पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार असून मुंबई-मांडवा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे.
mumbai gateway of india to mandwa water tarnsport start
mumbai gateway of india to mandwa water tarnsport startAI Image
Published On
Summary
  • मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया जलवाहतूक आजपासून पुन्हा सुरू

  • पावसाळ्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून फेरी सेवा बंद

  • फेरी सेवा सुरू झाल्याने मुंबई-मांडवा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर

  • मांडवा, अलिबाग आणि परिसरातील पर्यटनस्थळांना जाणाऱ्या पर्यटकांना मोठा फायदा

तुम्हाला देखील आता मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान प्रवास करायचा असेल तर तुमच्यासाठी गुड न्यूज. पावसाळ्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेली मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यानची जलवाहतूक अखेर आजपासून पुन्हा सुरू होत आहे. समुद्रमार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह पर्यटकांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. बोट सेवा पुन्हा सुरू झाल्याने मांडवा परिसरासह मुंबईत ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

दरवर्षी लाखो प्रवासी मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया या जलमार्गाचा वापर करतात. मिळालेल्या माहितीनुसार, वर्षभरात १५ लाखांहून अधिक प्रवासी मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान प्रवास करण्यासाठी बोटचा पर्याय निवडतात. त्यामुळे पावसाळ्यात तीन महिने ही सेवा बंद राहिल्याने प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत होता. आता जलवाहतूक पूर्ववत झाल्याने प्रवाशांचा वेळ वाचणार असून मुंबई आणि मांडवा दरम्यानचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. जलवाहतुकीमुळे मुंबई ते अलिबाग अंतर फक्त ६० मिनिटात कापता येत.

mumbai gateway of india to mandwa water tarnsport start
Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी ३० दिवस आधी शरीरात दिसतील 'ही' ६ लक्षणे; दुर्लक्ष करू नका नाहीतर....

पावसाळ्याच्या काळात अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात लाटा निर्माण होतात. समुद्र खवळलेला असल्याने बोटींच्या वाहतुकीदरम्यान अपघाताचा धोका वाढतो. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत दरवर्षी पावसाळ्यात जलवाहतूक काही काळासाठी बंद ठेवली जाते. यंदाही सुरक्षेच्या दृष्टीने तीन महिन्यांपासून ही सेवा बंद होती.

mumbai gateway of india to mandwa water tarnsport start
Karlyacha Juice : डायबिटीजला आता बोला बाय बाय! कारल्याचा ज्यूस दररोज प्यायल्याने 'हे' ६ आजार पळतील दूर

आता पावसाचा जोर कमी होत असल्याने आणि समुद्रातील परिस्थिती तुलनेने सुरक्षित झाल्याने बोट सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सेवा सुरू झाल्यामुळे मुंबईहून मांडवा, अलिबाग आणि परिसरातील पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांचीही मोठी सोय होणार आहे. विशेषतः शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी या मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. जलवाहतूक सुरू झाल्याने रस्ते आणि रेल्वे मार्गावरील प्रवासी वाहतुकीचा काहीसा भार कमी होण्यासही मदत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com