Mumbai : मुंबईतील रॅलीपूर्वी मनसे नेते संदीप देशपांडेंच्या टीशर्टची जोरदार चर्चा; भाजपला डिवचलं

Mumbai Dadar Sandip Deshpande : दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या ३६ दिवसांच्या आंदोलनाच्या यशानंतर मुंबईत ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली विजयोत्सव रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीपूर्वी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या टी-शर्टची जोरदार चर्चा रंगली आहे.
SANDEEP DESHPANDE'S CONTROVERSIAL T-SHIRT SPARKS POLITICAL ROW AHEAD OF MUMBAI VICTORY RALLY
SANDEEP DESHPANDE'S CONTROVERSIAL T-SHIRT SPARKS POLITICAL ROW AHEAD OF MUMBAI VICTORY RALLYSaam tv
Published On
Summary
  • दिल्लीतील ३६ दिवसांच्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर यश मिळालं आहे

  • ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली विजयोत्सव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे

  • रॅलीपूर्वी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या टी-शर्टची जोरदार चर्चा सुरू झाली आहे

  • दादर परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त आणि वाहतूक व्यवस्थेत विशेष बदल करण्यात आले आहेत

दिल्लीतील जंतर मंतरवर गेले ३६ दिवस सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काल यश आलं. या ३६ दिवसांत अनेक ठिकाणाहून विद्यार्थी आंदोलनात सामील झाले होते. यादरम्यान त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, मात्र एकही जण मागे हटला नाही. अखेर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला असून CJP ने सरकार समोर ठेवलेल्या मागण्या मंजूर करण्यात आल्या. तरुणाईच्या या यशाच्या निमित्ताने आज मुंबईत ठाकरे बंधूंच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत एक भव्य रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीपूर्वी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी घातलेल्या टीशर्टची जोरदार चर्चा सुरु आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज होणाऱ्या विजयोत्सवाच्या रॅलीसाठी एक टीशर्ट घातलं आहे. या टीशर्टने सध्या सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. या टीशर्टवर हिटलरच्या वेशात मोदींचा फोटो असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान साम टीव्हीशी संवाद साधताना त्यांनी हे टीशर्ट GEN Z कडून प्रेरणा घेऊन हे टीशर्ट बनवलं असल्याचं म्हटलं. तसेच तरुणाईच्या या यशाचं कौतुक देखील केलं. संदीप देशपांडेंच्या या टीशर्टवर हिटलर का बेटा झुटलर असा मजकूर लिहिलेला असून यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.

ठाकरे बंधूंची ही रॅली आज छत्रपती शिवाजी महाराज पार्क ते प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरापर्यंत काढण्यात येणार आहे. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर आज दादर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

SANDEEP DESHPANDE'S CONTROVERSIAL T-SHIRT SPARKS POLITICAL ROW AHEAD OF MUMBAI VICTORY RALLY
Kitchen Hacks : करपलेल्या भांड्यांवरचा काळपटपणा चुटकीसरशी होईल गायब, 'या' सोप्या टिप्स करून पहा

तसेच राज ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे या रॅलीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे लावले जाणार नसून ही रॅली विद्यार्थ्यांच्या यशाची रॅली म्हणून काढण्यात येईल. मुंबई वाहतूक पोलिसांनी देखील रॅली दरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी अधिसूचना जारी केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com