Shocking : मुंबईत धावत्या लोकलमध्ये विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं! तरुणाने जबरदस्ती केली अन्....

Mumbai Local Crime News : डहाणू-बोरिवली मेमूच्या महिला डब्यात विद्यार्थिनीवर अज्ञात इसमाने हल्ला करून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना. विद्यार्थिनीच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.
Mumbai Local College Student Harrasement Crime News
Mumbai Local College Student Harrasement Crime News AI Image
Published On
Summary
  • डहाणू-बोरिवली मेमूच्या महिला डब्यात विद्यार्थिनीवर हल्ल्याचा धक्कादायक प्रकार

  • संधी पाहून तरुणीवर जबरदस्ती केली

  • रेल्वे सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

मुंबई लोकल म्हणजे सर्वसामान्य नागरिकांसाठी एक जीवनवाहिनी आहे. या लोकलमधल्या सुख दुःखाच्या अनेक घडामोडी आपल्यासमोर येतात. मात्र आता मुंबईच्या डहाणू रेल्वे स्थानकावरून पहाटेच्या सुमारास सुटणाऱ्या डहाणू-बोरिवली धावत्या मेमू लोकलमध्ये एका विद्यार्थिनीवर हल्ला आणि जबरदस्ती झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुदैवाने मुलीच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला आहे. यानंतर पुन्हा एकदा रेल्वेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी डहाणू स्थानकातून मेमू लोकल बोरिवलीच्या दिशेने रवाना झाली. यावेळी महिला डब्यात पीडित तरुणी एकटीच प्रवास करत होती. डब्यात अन्य महिला प्रवासी नसल्याची संधी साधत एक अज्ञात इसम अचानक महिला डब्यात शिरला. डब्यात आल्यानंतर त्याने सुरुवातीला गाडी कुठे पोहोचली आहे, असे विचारात तरुणीशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अचानक त्याने तरुणीचा गळा दाबून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तरुणीने स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याच्या कृत्याला प्रतिकार केला.

Mumbai Local College Student Harrasement Crime News
Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी ३० दिवस आधी शरीरात दिसतील 'ही' ६ लक्षणे; दुर्लक्ष करू नका नाहीतर....

तरुणीने आरोपीच्या डोळ्यांवर बोटांनी हल्ला करत त्याला मागे ढकलले. त्याचवेळी तिने मोठ्याने आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून बाजूच्या डब्यातील तसेच परिसरातील प्रवासी मदतीसाठी धावून आले. प्रवाशांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाणगाव स्थानकाजवळ झालेल्या झटापटीचा फायदा घेत आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला.

Mumbai Local College Student Harrasement Crime News
Karlyacha Juice : डायबिटीजला आता बोला बाय बाय! कारल्याचा ज्यूस दररोज प्यायल्याने 'हे' ६ आजार पळतील दूर

घटनेनंतर तरुणीने तातडीने ११२ या आपत्कालीन क्रमांकावर फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तत्काळ मदत मिळाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. पहाटेच्या वेळी महिला डब्यात एकटी प्रवास करणाऱ्या तरुणीच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे गंभीरपणे समोर आला आहे.तसेच लोकलच्या डब्यात कोणताही पोलीस कर्मचारी उपस्थित का नव्हता? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान आता या प्रकरणी पोलीस नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com