

मयूर राणे, साम प्रतिनिधी
भांडुपमधील एका खासगी रुग्णालयामध्ये एका कर्मचाऱ्याने १९ वर्षाच्या मुलीसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. पीडित मुलगी हॉस्पिटलमध्ये तिच्या एका नातेवाईकाला बघायला आली होती. त्यावेळी वासनांध असलेल्या एका कर्मचाऱ्याने तिच्यावर अति प्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याघटनेची माहिती मनसेच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेतली.
मनसे पदाधिकारी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन दिला त्या युवकास चांगला चोप दिला. त्यानंतर घटनास्थळी भांडुप पोलीस दाखल झाले. असून त्यांनी या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतला आहे खाजगी रुग्णालयात अशाप्रकारे रात्रीच्या वेळी मुलीसोबत अतिप्रसंग करण्याची घटना समोर आल्यामुळे रुग्णालयांमधील महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
कल्याण पश्चिमेतील एका उच्चभ्रू सोसायटीत निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने महिलांशी गैरवर्तन, अश्लील शिवीगाळ आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याची घटना एक दिवसापूर्वी घडली होती. या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८:३० च्या सुमारास वल्लभ टॉवर येथे राहणाऱ्या एक महिला लहान मुलाला घेऊन बाहेर जाण्यासाठी दुचाकी पार्किंगमधून बाहेर काढत होत्या. त्यावेळी सोसायटीतच राहणारे निवृत्त पोलीस अधिकारी बी. एल. पवार यांनी मुद्दाम आपली गाडी महिलेच्या गाडीमागे लावली होती. यानंतर त्याने महिलेला शिवीगाळ केली. या वादाचे रूपांतर पुढे मोठ्या हाणामारीत झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.