मुंबई भाजपकडून नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली
अध्यक्ष अमित साटम यांनी पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केली
किरण शेलार, रवी राजा, अभिजीत सामंत यांच्यासह अनेक नेत्यांना उपाध्यक्षपद देण्यात आले
आगामी निवडणुका लक्षात घेऊन भाजपने संघटनात्मक बदल केले
मुंबई भाजपकडून नव्या कार्यकारिणीची आज घोषणा करण्यात आली. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी नवीन कार्यकारिणी जाहीर केली. उपाध्यक्ष,सरचिटणीस, चिटणीस, कोषाध्यक्ष, कार्यालय प्रमुख, प्रवक्ता, कार्यकारिणी सदस्य या पदावर अनेकांची नियुक्ती करण्यात आली. किरण शेलार, रवी राजा, अभिजीत सामंत, पंकज यादव, अमरजित मिश्रा यांची उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. तर राजेश शिरवडकर, पवन त्रिपाठी, श्वेता परुळेकर, विनोद शेलार यांची महामंत्री पदी नियुक्ती करण्यात आली.
तर कोषाध्यक्ष पदी किरीट बन्साळी, युवा मोर्चा अध्यक्ष पदी दीपक सिंह यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी सन्नी सानप, महिला मोर्चा अध्यक्ष योगिता ठोकले याची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी निवडणुकी आणि राजकीय समीकरणं लक्षात घेऊ भारतीय जनता पार्टीकडून मुंबईचे पदाधिकार आणि कार्यकारणीची घोषणा करण्यात आली आहे.
२४ फेब्रुवारी रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्यातील नवीन कार्यकारणीची घोषण केली होती. मुख्य प्रवक्ता, सरचिटणीस, चिटणीस, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि भाजप युवा मोर्चा अध्यक्ष या पदांचा यामध्ये समावेश होता. अनुभवी नेत्यांसोबतच सुजय विखे पाटील, भारती पवार आणि कृष्णराज महाडिक या नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती. नवनाथ बन यांच्याकडे मुंबईतील मुख्य प्रवक्ता पदाची जबाबदारी देण्यात आली.
अभिजित सामंत
अमरजित मिश्रा
महेश पारकर
राजश्री पलांडे
रश्मी मिरचंदानी
रवि राजा
पंकज यादव
किरण शेलार
राजेश शिरवडकर
आचार्य पवन त्रिपाठी
श्वेता परूळकर
विनोद शेलार
राजेश शिरवडकर
आचार्य पवन त्रिपाठी
श्वेता परूळकर
विनोद शेलार
किरीट भन्साली
दिनेश जगताप
अनिकेत निकम
निरंजन शेट्टी
सुमिता सुमन सिंग
राहुल दिनानाथ तिवारी
अजय सिंह
उदय प्रताप सिंह
किशोर जोशी
महेश कारिया
विजय गोवळकर
राजेश रस्तोगी
अजित मन्याल
संतोष ठाकूर
एकनाथ संगम
योगेश दुबे
अमोल जाधव
विवेकानंद गुप्ता
मोहन गौड़ा
गणेश पांडे
कुशल जैन
विजय पगारे
आशिष साळसकर
अखिलेश सिंह
अशोक राय
रवींद्र खोत
सीताराम तिवारी
विश्वबंधु राय
अजय तिवारी
इंद्रसेन उपाध्याय
लक्ष्मण कणल
निहारिका खोदले
महेश मुदलियार
जय नागवानी
१. अध्यक्ष युवा मोर्चा - दीपक सिंह
२. अध्यक्ष महिला मोर्चा - योजना ठोकळे
३. अध्यक्ष ओ.बी. सी मोर्चा - सन्नी सानप
४. अध्यक्ष अनुसूचित जाति मोर्चा - शरद कांबळे
५. अध्यक्ष उत्तर भारतीय मोर्चा - प्रमोद मिश्रा
६. अध्यक्ष अल्पसंख्यांक मोर्चा - वसीम खान
७. अध्यक्ष झोपडपट्टी मोर्चा - धनंजय कोलकर
८. संयोजक लीगल सेल - अॅड अमीत मेहता, सह संयोजक - अॅड. मदन गुप्ता
९. संयोजक आयटी व सोशल मिडिया सेल - नचिकेत सहस्रबुद्धे , सह संयोजक - पल्लवी ताम्हणकर
१० संयोजक गुजराती सेल - बिमल भूता, सह संयोजक श्री. सी.वी शाह
११. संयोजक इंडस्ट्रीज सेल - भरत अज्वानी
१२ संयोजक शिक्षण सेल - डॉ. राजू बंडगर
१३ संयोजक सांस्कृतिक सेल - जेसल कोठारी
१४ उत्तराखंड सेल - महेंद्रसिंह गोसाई
१५ संयोजक पारसी सेल - खुसरो खेकोबाद
१६ संयोजक सिंधी सेल - रोहित भगनारी
१७ संयोजक मच्छिमार सेल - निकेश वैती
१८ संयोजक परराष्ट्र व्यवहार - जतीन देसाई
१९ संयोजक बिहार प्रकोष्ठ - मनोज झा
२० अध्यक्ष कोकण आघाडी - सुहास आडिवरेकर
२१ अध्यक्ष कामगार आघाडी - अभिजित राणे
२२ अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र आघाडी - पांडुरंग थोरात
२३ संयोजक वरिष्ठ कार्यकर्ता आघाडी - दिलीप गोडांबे
२४ संयोजक सहकार आघाडी - सुनील बाम्बुलकर
२५ अध्यक्ष भटके विमुक्त आघाडी - चंद्रकांत शिंदे
२६ अध्यक्ष माजी सैनिक आघाडी - सुभाष दरेकर
२७ अध्यक्ष रिक्क्षा व टॅक्सी चालक आघाडी - के. के. तिवारी
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.