BJP Candidate: राज्यसभेसाठी भाजपकडून ४ उमेदवारांच्या नावांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? तर कुणाचा पत्ता कट?

Maharashtra BJP Rajya Sabha Candidates List: भाजपकडून राज्यसभेच्या ४ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. रामदास आठवले, विनोद तावडे, माया चिंतामण ईवनाते आणि रामराव वडकुते यांना उमेदवारी देण्यात आली.
BJP Candidate: राज्यसभेसाठी भाजपकडून ४ उमेदवारांच्या नावांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? तर कुणाचा पत्ता कट?
maharashtra bjp rajya sabha candidate listSaam tv
Published On

Summary -

  • भाजपने राज्यसभेसाठी ४ उमेदवारांची यादी जाहीर केली

  • रामदास आठवले यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली

  • अनेक दिग्गज नेत्यांचा पत्ता कट करत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली

  • राज्यसभा निवडणुकीसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार आहे

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून ४ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. रामदास आठवले, विनोद तावडे, माया चिंतामण ईवनाते आणि रामराव वडकुते यांना भाजपने राज्यसभेसाठी संधी दिली आहे. रामदास आठवले यांना भाजपने राज्यसभेसाठी पुन्हा संधी दिली आहे. अनेक दिग्गज नेत्यांच्या पत्ता कट करत भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

भाजपने कुणाला दिली संधी?

राज्यसभेच्या ३७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातल्या ७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यामधील महायुतीकडे ६ जागा आणि महाविकास आघाडीकडे १ जागा असणार आहे. महायुतीमधील ६ पैकी ४ जागा भाजपकडे १ जागा शिंदेसेनेकडे आणि १ जागा राष्ट्रवादीकडे आहे. भाजपने आज ४ जागांच्या उमेदवारांची नावं जाहीर केली. रामदास आठवले, विनाोद तावडे, माया ईवनाते आणि रामराव वडकुते यांना भाजपने संधी दिली. तर राष्ट्रवादीकडून पार्थ पवारांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. शिंदेसेनेचा उमेदवार अद्याप ठरला नाही.

BJP Candidate: राज्यसभेसाठी भाजपकडून ४ उमेदवारांच्या नावांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? तर कुणाचा पत्ता कट?
BJP Rajya Sabha Candidates: राज्यसभेसाठी भाजपचे उमेदवार ठरले, विनोद तावडेंसह १० नेत्यांची नावं चर्चेत

भाजपने कुणाचा पत्ता केला कट?

भाजपकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी १० जणांची नावं चर्चेत होती. राज्यसभेच्या ४ जागांसाठी कुणाला संधी द्यायची यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांवर बैठका झाल्या. भाजपकडून राज्यसभेसाठी विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील आणि भागवत कराड यांच्यासह काही नेत्यांची नावं चर्चेत होती. पण भाजपने काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली. भाजपने रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील आणि भागवत कराड या दिग्गज नेत्यांचा पत्ता कट केला.

BJP Candidate: राज्यसभेसाठी भाजपकडून ४ उमेदवारांच्या नावांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? तर कुणाचा पत्ता कट?
Rajyasabha Election : राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीचे 5 उमेदवार ठरले

कधी होणार मतदान?

राज्यसभेच्या ३७ जागांसाठी येत्या १६ मार्च रोजी मतदान होणार आहे. राज्यसभेच्या या निवडणुकीसाठी २६ फेब्रुवारीला नोटिफिकेशन जारी करण्यात आले होते. ५ मार्च हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. ६ मार्चला अर्जांची छाननी होणार आहे. ९ मार्चपर्यंत उमेदवार अर्ज मागे घेऊ शकतात. त्यानंतर १६ मार्चला सकाळी ९ वाजल्यापासून ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल. सायंकाळी ५ वाजता मतमोजणी सुरू होईल आणि २० मार्चपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल.

BJP Candidate: राज्यसभेसाठी भाजपकडून ४ उमेदवारांच्या नावांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? तर कुणाचा पत्ता कट?
Rajyasabha Election: राज्यसभेच्या रिक्त झालेल्या १० जागांसाठी होणार निवडणूक; अजित पवार गटाला संधी मिळणार?

राज्यसभा निवडणुकीचे वेळापत्रक -

५ मार्च – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत

६ मार्च – अर्जांची छाननी

९ मार्च – उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख

१६ मार्च – सकाळी ९ ते सायं. ४ मतदान; सायं. ५ नंतर मतमोजणी

BJP Candidate: राज्यसभेसाठी भाजपकडून ४ उमेदवारांच्या नावांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? तर कुणाचा पत्ता कट?
Rajyasabha Election: काँग्रेसची नवी खेळी, राज्यसभेच्या एका जागेवर दावा; उद्धव ठाकरेंपुढे नवा प्रस्ताव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com