Mumbai Pollution: मुंबईतील प्रदूषणाला MMRDA चे प्रकल्प जबाबदार? उच्च न्यायालयाच्या समितीने व्यक्त केली नाराजी, तातडीने कारवाईचे आदेश

Mumbai Air Quality: मुंबईतील अनेक भागांमध्ये AQI १६० च्या पुढे गेलाय. MMRDA प्रकल्पांमधील धूळ आणि राडारोड्यामुळे प्रदूषण वाढत असल्याचे उच्च न्यायालयाच्या समितीने म्हटले आहे. जे जे रुग्णालयात सर्दी, खोकला आणि दम्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.
Mumbai Air Quality
Mumbai Air Qualitysaam tv
Published On: 

मुंबईत पुन्हा एकदा वायू प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होताना दिसतेय. शहरातील अनेक भागांमध्ये हवेची गुणवत्ता खालावली असून काही ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १६० च्या पुढे गेलाय. दरम्यान, मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला MMRDA च्या प्रकल्पांमधून पसरणारी धूळ, माती आणि राडारोडा कारणीभूत असल्याचे उच्च न्यायालयाच्या समितीने निदर्शनास आणून दिलेत. विशेष म्हणजे, याबाबत वारंवार लक्ष वेधूनही संबंधितांवर कारवाई होत नसल्याने समितीने नाराजी व्यक्त केलीये. त्याचप्रमाणे जबाबदार व्यक्ती आणि संबंधितांवर तातडीने दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत.

मुंबईतील प्रदूषणात MMRDA च्या प्रकल्पांची भर?

मुंबईत सध्या अनेक ठिकाणी बांधकाम आणि विकासकामं सुरू आहेत. या प्रकल्पांमधून हवेत पसरणारी माती, धूळ यामुळे प्रदूषणात वाढ होत असल्याचं समितीने म्हटलंय. MMRDA च्या प्रकल्पांमुळे हवेची गुणवत्ता खराब होत असतानाही यावर योग्य ती कारवाई केली जात नसल्याचे समितीच्या निदर्शनास आलं. त्यामुळे समितीने याबाबत नाराजी व्यक्त करत संबंधितांवर तातडीने दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Mumbai Air Quality
उत्तर प्रदेशात निवडणुकीची तयारी नेमकी कुठपर्यंत? आयोग घेणार 18 जिल्ह्यांचा आढावा

मुंबईतील अनेक भागांमध्ये AQI १५० च्या पुढे

दुसरीकडे मुंबईच्या हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. सकाळच्या वेळी शहरावर धुरक्याची चादर पसरलेली पाहायला मिळत आहे. वाहनांमधून बाहेर पडणारा धूर आणि हवेत मिसळणारी धूळ यामुळे प्रदूषणात आणखी भर पडतेय. शहरातील अनेक भागांमध्ये AQI १५० च्या पुढे नोंदवण्यात आलाय.

  • अंधेरी पूर्व- १६२ AQI

  • वांद्रे पूर्व- १६१ AQI

  • बोरिवली- १६० AQI

  • वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स- १५६ AQI

  • अँटॉप हिल- १५४ AQI

  • वरळी- १४८ AQI

  • कुलाबा- १४० AQI

वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासून श्वसनाचे आजार असलेल्या व्यक्तींना याचा अधिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासन नेमक्या कोणत्या ठोस उपाययोजना करणार, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

Mumbai Air Quality
गोकुळचा सत्तासंघर्ष आणखी तीव्र, सहकार कायद्याची एन्ट्री होणार? चंद्रकांत पाटलांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

रुग्णालयात सर्दी, खोकला आणि दम्याच्या रुग्णांमध्ये वाढ

वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आता नागरिकांच्या आरोग्यावरही दिसू लागला आहे. जे.जे. रुग्णालयाच्या ओपीडीत प्रदूषणामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचं दिसत आहे. सध्या सर्दी, खोकला आणि दम्याचा त्रास असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याची माहिती जे.जे. रुग्णालयातील मेडिसिन विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. मधुकर गायकवाड यांनी दिली.

डॉ. मधुकर गायकवाड यांनी सांगितलं की, वाढत्या प्रदूषणाच्या काळात नागरिकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा. त्यामुळे धूळ आणि प्रदूषित हवेमुळे होणारा त्रास टाळण्यास मदत होऊ शकते. त्याचप्रमाणे श्वसनाचा त्रास अधिक जाणवत असल्यास वाफ घ्यावी. ज्या नागरिकांना आधीपासून अ‍ॅलर्जी किंवा दम्याचा त्रास आहे, त्यांनी या काळात अधिक सतर्क राहून स्वतःची काळजी घ्यावी, असा सल्लाही डॉ. गायकवाड यांनी दिला आहे.

Mumbai Air Quality
Metro 5 : ठाणे, भिवंडी आणि कल्याणकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो ५ च्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा

एकीकडे उच्च न्यायालयाच्या समितीने MMRDA च्या प्रकल्पांमधून होणाऱ्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली आहे, तर दुसरीकडे मुंबईकरांना खराब हवेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाकडून आता प्रत्यक्षात कोणती पावले उचलली जातात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.