

मुंबई गणपती विसर्जन मिरवणुकीत कार घुसली
प्रभादेवी परिसरात घडली घटना
गणपती विसर्जन मिरवणुकीत कारची भाविकांना धडक
मुंबईत गणेश विसर्जनादरम्यान चार भाविक जखमी
केजी मार्गचा राजा विसर्जन मिरवणुकीतील अपघात
मुंबईत गणपती विसर्जनादरम्यान अपघाताची भयंकर घटना घडली. प्रभादेवी परिसरामध्ये भरधाव कार विसर्जन मिरवणुकीमध्ये घुसली. या कारने भाविकांना धडक दिली. या अपघातामध्ये चार भाविक जखमी झाले त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातामध्ये काही काळ प्रभादेवी परिसरात गोंधळाचे वातावरण होते.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभादेवीत ‘KG मार्गचा राजा’च्या विसर्जन मिरवणुकीत कार घुसली. इंद्रा टॉवर, काकासाहेब गाडगीळ मार्ग परिसरात ही घटना घडली. भरधाव आणि निष्काळजीपणे कार चालवत असल्याचा चालकावर आरोप आहे. भरधाव कार मिरवणुकीत घुसल्यामुळे ४ जण जखमी झाले. या चारही जणांना किरकोळ दुखापत झाली. २ जखमींना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अन्य दोन जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
या अपघातानंतर कारचालक प्रणव राकेश अग्रवालला (वय २१ वर्षे) पोलिसांनी अटक केली. चालकासह कार देखील पोलिसांनी ताब्यात घेतली. चालकाला वैद्यकीय तपासणीसाठी सायन रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी जखमींचे सविस्तर जबाब नोंदवून घेतले आणि चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. या अपघातानंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण होते. या कार चालाकाविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.